जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / पलंगावर पत्नीचा मृतदेह तर पतीने घेतला गळफास, एकाच रुममध्ये आढळले दोघांचे मृतदेह, परभणीत खळबळ

पलंगावर पत्नीचा मृतदेह तर पतीने घेतला गळफास, एकाच रुममध्ये आढळले दोघांचे मृतदेह, परभणीत खळबळ

पलंगावर पत्नीचा मृतदेह तर पतीने घेतला गळफास, एकाच रुममध्ये आढळले दोघांचे मृतदेह, परभणीत खळबळ

पत्नीचा मृतदेह रम मधील कॉटवर, तर पतिचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ….

  • -MIN READ
  • Last Updated :

परभणी, 28 मार्च : परभणी जिल्ह्यातील (parbhani) सेलू शहरात  खळबळजनक घटना घडली आहे. एकाच खोलीमध्ये पती आणि पत्नीचे मृतदेह आढळून आले आहेत. घरातील पलंगावर पत्नीचा मृतदेह  तर गळफास घेतलेल्या अवस्थेतमध्ये पतीचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेलू शहरातील राजीव गांधीनगर भागात राहणाऱ्या अर्जुन गणेश आवटे (वय वर्ष 32) तर त्याची पत्नी प्रियंका आवटे ( वय 28)  या दोघांचे मृतदेह त्यांच्या खोलीमध्ये आढळून आले. प्रियंका आवटे हिचा मृतदेह कॉटवर पडलेला अवस्थेत होता. तर त्याच रूममध्ये लोखंडी पत्र्याच्या पाईपाला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेतमध्ये अर्जुन याचा मृतदेह आढळू आला. सकाळी उशीर झाला तरी घराचा दरवाजा न उघडल्याने अर्जुन यांच्या बहिणीने रूमची कडी वाजवली. परंतु, तरीदेखील बाहेर न आल्याने हा प्रकार तिने तिच्या वडिलांना सांगितला. त्यांनी देखील बाहेरून आवाज देऊन दरवाजा उघडायचा प्रयत्न केला. त्यानंतरही काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने शेवटी दरवाजा तोडायचा ठरवण्यात आलं आणि दरवाजा तोडून पाहिले असता, हा भयानक प्रकार त्यांच्या नजरेमध्ये पडला. ( एकतर्फी प्रेमातून आयटी इंजिनिअरची हद्द पार; मुंबईतील गायिकेला आणलं नाकीनऊ ) अर्जुन आणि प्रियंका यांचा तीन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. अर्जुन हा शहरातच ऑटोरिक्षा चालवून आपली उपजीविका भागवत होता. तर प्रियांका गृहिणीची भूमिका पार पाडत होती. या दाम्पत्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. तसंच प्रियांकाच्या मृत्यू कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. ( IPL 2022 : गुजरात टायटन्सच्या पहिल्या मॅचमध्ये ‘या’ 11 जणांना खेळवणार पांड्या ) घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले असून, अर्जुन आणि प्रियंका यांचा मृतदेह पुढील तपासणीसाठी सेलू येथील शासकीय रुग्णालयामध्ये नेण्यात आला आहे. या प्रकारानंतर रुग्णालय परिसरामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. अर्जुन आणि प्रियंकाच्या नातेवाईकांनी देखील गर्दी केली आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दोघांच्या मृत्यूची नेमकी काय कारणे आहेत. हे पुढील तपासानंतर समजणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात