मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

पत्नीच्या यशाची पतीला मोजावी लागली किंमत; भररस्त्यात 7 गोळ्या घालून हत्या

पत्नीच्या यशाची पतीला मोजावी लागली किंमत; भररस्त्यात 7 गोळ्या घालून हत्या

पतीवर भररस्त्यात 7 गोळ्या झाडण्यात आल्या, यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

पतीवर भररस्त्यात 7 गोळ्या झाडण्यात आल्या, यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

पतीवर भररस्त्यात 7 गोळ्या झाडण्यात आल्या, यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

जमुई, 8 डिसेंबर : बिहारमधील (Bihar News) जमुई जिल्ह्यातील काही गुन्हेगारांनी राजकीय रागाचा (Bihar Panchayat Election अत्यंत भीषण प्रकारे सूड उगवल्याचा प्रकार समोर आला आहे. नव निर्वाचित वॉर्ड सदस्यचा पती राजकुमार यादव यांच्यावर गोळ्या घालून हत्या (Murder) करण्यात आली. (wife who won the panchayat election husband was shot dead)

मिळालेल्या माहितीनुसार, आधीपासून दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी घरी परतत असताना राजकुमार यादव यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली, यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. मृत राजकुमार यादव हे ककनचोर पंचायतीच्या वार्ड क्रमांक 12 च्या नवनिर्वाचित वार्ड सदस्य प्रतिमा देवी यांचे पती असल्याचं समोर आलं आहे. त्यांचे पती गावातील डॉक्टरचंदेखील काम करीत होते.

हत्येची ही घटना जिल्ह्यातील लक्ष्मीपूर पोलीस ठाणे हद्दीतील मगही गावातील आहे. काल रात्री वॉर्ड सदस्य महिसेचे पती यांच्यावर गावातील क्लिनिकजवळ गोळ्या घालून हत्या केली. मृत राजकुमार यादव यांच्यावर 7 गोळ्या झाडण्यात आल्या. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळाहून 13 काडतूसांचे खोके सापडले आहे. गावातील संजय यादव यांच्या टीमच्या लोकांनी ही हत्या केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यंदा पंचायत निवडणुकीत मृत राजकुमार यादव यांची पत्नी प्रतिमा देवी ककनचोर या पंचायत वॉर्ड क्रमांक 12 मधून निवडणूक आल्या आहेत.

हे ही वाचा-'बर्थ डे' पार्टीला बोलावून पाजली दारू; पुण्यातील तरुणीवर तळजाई जंगलात बलात्कार

राजकीय वितुष्टातून ही हत्या करण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात पोलीस ठाण्याचे प्रमुख सुबोध कुमार यांनी सांगितलं की, मंगळवारी रात्री ही घटना घडली. मृत व्यक्ती हे नवनिर्वाचित वॉर्ड सदस्य प्रतिमा देवी यांचे पती आहेत. त्यांना भर रस्त्यात गोळ्या झाडण्यात आल्या. यात त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात नवनिर्वात वॉर्ड सदस्य प्रतिमा देवी यांनी पतीच्या हत्ये प्रकरणात पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.

First published:

Tags: Bihar, Election, Murder, Wife and husband