मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /मुलगी झाली म्हणून पत्नीची हत्या; नवजात बाळाला आईच्या मृतदेहाशेजारी ठेवून कुटुंबीय फरार!

मुलगी झाली म्हणून पत्नीची हत्या; नवजात बाळाला आईच्या मृतदेहाशेजारी ठेवून कुटुंबीय फरार!

महिलेचे कुटुंबीय आले तर आईच्या मृतदेहाशेजारी नवजात बाळ रडत होतं.

महिलेचे कुटुंबीय आले तर आईच्या मृतदेहाशेजारी नवजात बाळ रडत होतं.

महिलेचे कुटुंबीय आले तर आईच्या मृतदेहाशेजारी नवजात बाळ रडत होतं.

पाटना, 23 जानेवारी : बिहारमधील (bihar News) विचित्र पतीने आपल्या पत्नीची हत्या (Killed Wife) केल्याचा प्रकार समोर आला आहे. पत्नीने एका मुलीला जन्म दिला म्हणून पतीने थेट पत्नीची हत्या केली. बाळाच्या जन्माच्या 48 तासांनतर माथेफिरू पतीने पत्नीचा गळा दाबून तिची हत्या केली. त्या नराधमाने नवजात बाळाचाही विचार केला नाही.

आईची हत्या केल्यानंतर नवजात बाळाला कोण सांभाळणार असा प्रश्न उभा राहिला आहे. रविवारी सकाळी जेव्हा महिलेच्या माहेरच्या सदस्यांना याबाबत कळालं त्यानंतर ते हादरलेच. माहेरची मंडळी तातडीने मुलीच्या सासरी पोहोचली. तर येथे कोणीच नव्हतं. केवळ मुलीचा मृतदेह पडला होता. आणि मुलीच्या मृतदेहाशेजारी बाळ रडत होतं. घटनेबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हुंडा न दिल्याने तिची हत्या करण्यात आली आहे. दुसरीकडे आरोपींचा शोध घेतला जात आहे.

हे ही वाचा-मुंबई: पतीला डांबून महिलेवर केला रेप; गावगुंडाची पोलिसांनी काढली धिंड,पाहा VIDEO

9 महिन्यांपूर्वी झालं होतं लग्न..

माहेरच्यांनी सांगितलं की, 28 एप्रिल 2021 रोजी लक्ष्मण कुमारसह शोभाचं लग्न झालं होतं. लग्नानंतर लक्ष्मण तिला हुंड्यासाठी छळ करीत होता. तिला मारहाणही केली जात होती. यासाठी गावात अनेकदा पंचायतदेखील बोलवली गेली होती. पंचायतीत चांगलं वागणार असल्याचं सांगूनही तो शोभाला मारहाण करीत होता.

दरम्यान शुक्रवारी शोभाने एका मुलीला जन्म दिला. मुलीला जन्म दिला म्हणून शोभाला पुन्हा सासरच्या मंडळींची बोलणी ऐकावी लागली. तिला त्रास देऊ लागले. शनिवारी रात्री जेव्हा शोभाने याला विरोध केला तर तिची गळा दाबून हत्या करण्यात आली, अशी माहिती समोर येत आहे.

First published:

Tags: Bihar, Crime, Murder