Home /News /mumbai /

Mumbai: पतीला डांबून महिलेवर केला बलात्कार; गावगुंडाची पोलिसांनी काढली धिंड, पाहा VIDEO

Mumbai: पतीला डांबून महिलेवर केला बलात्कार; गावगुंडाची पोलिसांनी काढली धिंड, पाहा VIDEO

Crime in Mumbai: विविध प्रकारचे गुन्हे करून परिसरात आपल्या नावाची दहशत निर्माण करणाऱ्या एका गावगुंडाला तुळींज पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली आहे. परिसरातील नागरिकांच्या मनातून गुंडाबद्दल भीती कमी व्हावी, यासाठी पोलिसांनी त्याची धिंड काढली आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 23 जानेवारी: विविध प्रकारचे गुन्हे करून परिसरात आपल्या नावाची दहशत निर्माण करणाऱ्या एका गावगुंडाला तुळींज पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली आहे. परिसरातील नागरिकांच्या मनातून गुंडाबद्दल भीती कमी व्हावी, यासाठी पोलिसांनी त्याची धिंड काढली आहे. तुळींज पोलिसांनी संबंधित गावगुंडाच्या हातात हातकडी आणि साखळी बांधून त्याची तब्बल दोन तास पायी धिंड काढली आहे. त्यांनी तुळींज पोलीस ठाण्यापासून त्याची दहशत असणाऱ्या परिसरात पायी फिरवलं आहे. नागरिकांसोबत गुंडगिरी करणाऱ्या गुन्हेगारांची गय केली जाणार नाही, असा इशारा देण्यासाठी पोलिसांनी कुख्यात गावगुंडाची धिंड काढल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. मोनू रायडर असं तुळींज पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोनू याने बळजबरीने घरात घुसून एका महिलेला आणि तिच्या पतीला बेदम मारहाण केली होती. त्यानंतर आरोपी मोनूच्या काही साथीदारांनी पीडित महिलेच्या पतीला दुचाकीवर बसवून एका निर्जनी ठिकाणी घेऊन गेले होते. याठिकाणी आरोपींनी पीडितेच्या पतीला काही तास डांबून ठेवलं (kept husband hostage) होतं. दरम्यान नराधम मोनू रायडर याने विकृतीच्या सर्व परिसीमा गाठत महिलेला धमकावून तिच्यावर दोनदा बलात्कार केला (Raped twice on married woman ) होता. एवढेच नव्हे तर त्याने पीडित महिलेच्या शरीरावर अनेक ठिकाणी गंभीर जखमा केल्या. बलात्कार केल्यानंतर आरोपीनं घरात ठेवलेली रक्कमही लुटून नेली होती. आरोपीच्या साथीदारांनी महिलेच्या पतीला आचोळे परिसरात दोन तास ओलीस ठेवलं होतं. दुसऱ्या दिवशी पहाटे 4 च्या सुमारास महिलेच्या पतीची सुटका केली होती. हेही वाचा-पुण्यात नामांकित कंपनीच्या महिला मॅनेजरवर कारमध्ये रेप, मग गाठला विकृतीचा कळस या धक्कादायक प्रकारानंतर पीडित महिलेनं तुळींज पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी बलात्कार, अपहरण, दरोडा आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करून आरोपी मोनू रायडरला मीरा रोड परिसरातून अटक केली होती. विशेष म्हणजे आरोपी मोनू रायडरवर विविध पोलीस ठाण्यात खून, दरोडा, प्राणघातक हल्ला असे एकूण 16 गुन्हे दाखल आहेत. त्याची दहशत संपवण्यासाठी शनिवारी पोलिसांनी त्याला प्रगतीनगर परिसरातून धिंड काढली. पण नुकताच मोनू रायडर जामिनावर तुरुंगातून बाहेर आला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Mumbai, Rape

    पुढील बातम्या