मराठी बातम्या /बातम्या /देश /लालूपुत्राला म्हणे दिसतं भूत; तेजप्रताप घेतात महादेवाचं नाव

लालूपुत्राला म्हणे दिसतं भूत; तेजप्रताप घेतात महादेवाचं नाव

आपल्या स्वप्नात एक भूत (ghost) आलं होतं, आपण महादेवाचं (God Mahadeva) नाव घेताच ते घाबरलं, असं वक्तव्य बिहारचे मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांचे पुत्र तेजप्रताप (Tej Pratap Yadav) यांनी केलं आहे.

पटना, 3 ऑगस्ट : आपल्या स्वप्नात एक भूत (ghost) आलं होतं, आपण महादेवाचं (God Mahadeva) नाव घेताच ते घाबरलं, असं वक्तव्य बिहारचे मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांचे पुत्र तेजप्रताप (Tej Pratap Yadav) यांनी केलं आहे. एका जाहीर कार्यक्रमात बोलताना त्यांनी विनोदी शैलीचा उपयोग करत फेसबुक पेजवरून भुताची कथा सांगितली आणि सत्ताधारी जेडियूवर जोरदार टीका केली.

काय म्हणाले तेजप्रताप?

बिहारमधील हसनपूर भागात पुराची पाहणी करण्यासाठी आपण गेलो असल्याचं स्वप्न आपल्याला पडलं होतं. त्या ठिकाणी आपण फिरत असताना अचानक झाडावर आपल्याला एक भूत दिसलं. त्या भुताला पाहून आपण घाबरलो आणि महादेवाचं नामस्मरण सुरू केलं. ते ऐकून भूत घाबरलं आणि पळून जाऊ लागलं. तू त्रास का देतोस, असं जेव्हा मी भुताला विचारलं, तेव्हा त्यानं दिलेलं उत्तर ऐकून आपण आश्चर्यचकित झाल्याचं तेजप्रताप म्हणाले. आपण तुमचं भाषण ऐकण्यासाठीच इथे आलो होतो, असं उत्तर भूतानं आपल्याला दिल्याचं तेजप्रताप यांनी त्यांच्या खास बिहारी शैलीत सांगितलं.

ब्रँडिंग की आत्मस्तुती?

लोक लालू प्रसाद यादव यांची छबी आपल्यात पाहत असल्याचं तेजप्रताप यांनी सांगितलं. फुरवरिया गावात जन्म झालेल्या एका गरीब घरातला मुलगा पुढे जाऊन संसद आणि देशाचं राजकारण करेल, याचं कुणी स्वप्न तरी पाहिलं होतं का, असा सवाल त्यांनी केला. आपण गरीबी पाहिली नाही, आपल्याला लहानपणापासून कुठल्याच गोष्टीची कमतरता जाणवली नाही. हे सर्व आपल्या वडिलांमुळे शक्य झालं. यापुढे आपणही वडिलांच्याच पावलावर पाऊल ठेऊन जनतेची सेवा करणार असल्याचं तेजप्रताप म्हणाले.

हे वाचा -Inside Video'..पंतप्रधान पाणीही विचारत नाही', संजय राऊत यांनी व्यक्त केली नाराजी

नितीश कुमारांवर टीका

चिंचेच्या झाडाला जेवढी पानं असतात, तेवढे भ्रष्टाचार नितीश कुमारांनी केल्याची टीका तेजप्रताप यादव यांनी केली. लालूंच्या साथीनं मोठ्या झालेल्या ज्या ज्या लोकांनी त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यांना जनतेनं धडा शिकवावा, असं आवाहन त्यांनी केलं.

First published: