Home /News /crime /

प्रेमविवाह केल्यानंतर एकमेकांच्याच चारित्र्यावर संशय, कंटाळून पत्नीची केली हत्या

प्रेमविवाह केल्यानंतर एकमेकांच्याच चारित्र्यावर संशय, कंटाळून पत्नीची केली हत्या

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

अन्सार आणि रोजी यांचा सात वर्षांपूर्वी प्रेमविवाह (Love Marriage) झाला होता. यानंतर धक्कादायक बाब म्हणजे, दोघांनाही एकमेकांच्या चारित्र्यावर संशय होता. याच कारणावरुन दोघांमध्ये वाद होत होते.

    मुंबई, 29 मे : वेगवेगळ्या कारणामुळे पतीने पत्नीची तर कधी पत्नीने पतीची हत्या (Murder) केल्याचे तुम्ही वाचले असेल. मुंबईत याचप्रकारची आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईच्या गोरेगाव (Mumbai Goregaon) परिसरात ही घटना घडली. काय आहे घटना - पत्नी पतीचा मानसिक छळ करते आणि चारित्र्याच्या संशयातून कंटाळून पतीने आपल्याच पत्नीचा खून (Wife Murder by Husband) केल्याची धक्कादायक घटना घडली. रोझी खातून असे आरोपी महिलेचे नाव आहे. तिच्या पतीने गळा आवळून तिचा खून केला. ही घटना गोरेगावच्या संतोष नगर (Santosh Nagar Goregaon) परिसरात घडली. अन्सार अली हिफाजत अली उर्फ समीर असे आरोपी पतीचे नाव आहे. अन्सार आणि रोजी यांचा सात वर्षांपूर्वी प्रेमविवाह (Love Marriage) झाला होता. यानंतर धक्कादायक बाब म्हणजे, दोघांनाही एकमेकांच्या चारित्र्यावर संशय होता. याच कारणावरुन दोघांमध्ये वाद होत होते. अन्सारने 25 मेला संतोष नगरमध्ये एक फ्लॅट भाडेतत्त्वावर घेतला होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी अन्सारने रोझी हत्या करत मेहुणी ज्युली हिला याबाबत माहिती दिली. यानंतर तिला धक्काच बसला. ज्युली हिने लगेचच शेजारी असलेल्या किराणा दुकानचालक प्रमोद मोर्या यांना याबाबत सांगिलते. यानंतर दिंडोशी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. फरार आरोपीच्या शोधात पोलीस होते. पोलिसांना चकमा देण्यासाठी तो रेल्वेच्या शौचालयात जाऊन लपला. मात्र, त्याच्या शोधात असलेल्या पोलिसांनी त्याला चलाखीने अवघ्या 24 तासांत अटक केली. हेही वाचा - क्षुल्लक कारणावरुन पोटचा पोरगाच झाला वैरी, कुऱ्हाडीचे घाव घालत जन्मदात्या पित्याची केली हत्या खून मुंबईत, 24 तासांत अटक उत्तर प्रदेशातून... पोलिसांना मिळालेल्या माहितीवरुन पोलिसांचे एक पथक विमानाने उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे पोहोचले होते. तेथे पोहोचल्यावर पोलिसांनी सापळा रचला. प्रयागराज रेल्वे स्थानकावर लोकलचे सर्व प्रवाशी आणि जनरल डब्यांची तपासणी करण्यात आली. मात्र, तरीही आरोपी सापडला नाही. अखेर गाडी सुटणार इतक्यात शौचालय तपासण्यात आले आणि आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले. दिंडोशी पोलिसांनी 24 तासांत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Mumbai, Murder, Wife

    पुढील बातम्या