Home /News /maharashtra /

क्षुल्लक कारणावरुन पोटचा पोरगाच झाला वैरी, कुऱ्हाडीचे घाव घालत जन्मदात्या पित्याची केली हत्या

क्षुल्लक कारणावरुन पोटचा पोरगाच झाला वैरी, कुऱ्हाडीचे घाव घालत जन्मदात्या पित्याची केली हत्या

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

भंडारा जिल्ह्यातून (Bhandara District) एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका वृद्ध पित्याची मुलानं हत्या (Murdered) केल्याचं घटना घडली आहे.

    भंडारा, 29 मे: भंडारा जिल्ह्यातून (Bhandara District) एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका वृद्ध पित्याची मुलानं हत्या (Murdered) केल्याचं घटना घडली आहे. वेगळं राहण्याचा सल्ला देणं या वृद्ध पित्याला महागात पडल्याचं समजतंय. वेगळे राहायचा सल्ला देणाऱ्या वृद्ध वडिलांच्या मानेवर मुलाने कुऱ्हाडीचा घाव घालून जागीच ठार केलं. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील सोनमाळ येथे रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी आरोपी मुलाला साकोली पोलिसांनी जेरबंद केलं आहे. 70 वर्षीय जानबा गोगलू मेश्राम असे मृत वडिलांचं नाव आहे. तर 33 वर्षीय देवेंद्र जानबा मेश्राम असं आरोपी मुलाचं नाव आहे. काय आहे नेमकी घटना? जानबा आणि मुलगा देवेंद्र एकाच कुटुंबात राहत असून रात्री जेवण झाल्यानंतर जानबाने आपला नातू अनिकेत याला तुझी आई सडा सारवण व्यवस्थित करीत नाही त्यामुळे तू आपल्या वडिलांना सांगून वेगळे राहा असे सांगत होता. त्याचवेळी दुसऱ्या खोलीत असलेल्या देवेंद्रने वडिलांचे बोलणे ऐकलं. रागाच्या भरात तो घरातून कुऱ्हाड आणत कोणताही विचार न करता थेट जन्मदात्या वडिलांचा मानेवर कुऱ्हाडीने घाव घातला. घाव इतका वर्मी बसल्याने वडील जानबा रक्तबंबाळ होत खाली पड़ून मृत्युमुखी पडले. ''तुमचे हे धंदे बंद करा'', रोहित पवारांना शिवसेना खासदाराचं भर कार्यक्रमात इशारा आरडाओरड होताच पाहुणी आलेल्या बहिण श्यामकला सहारे धावत आली असता तिला ही मारहाण केली आहे. या घटनेची माहिती होताच गावकरी घटना स्थळी धाव घेत घटनेची माहिती साकोली पोलिसांना देण्यात आली आहे. आरोपी देवेंद्र मेश्राम याला अटक करत त्याच्या विरुद्ध 302, 323 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. वृद्ध पित्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी साकोली रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. क्षुल्लक राग किती महागात पडतो याची प्रचिती सोनमाळा येथे पहायला मिळाली आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Murder

    पुढील बातम्या