जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / जमिनीसाठी पत्नीने केली पतीची हत्या, मुलगा आणि दीरानेही दिली साथ

जमिनीसाठी पत्नीने केली पतीची हत्या, मुलगा आणि दीरानेही दिली साथ

जमिनीसाठी पत्नीने केली पतीची हत्या, मुलगा आणि दीरानेही दिली साथ

वडिलोपार्जित जमीन विकण्याच्या (Wife kills husband in dispute over ancestral land) वादातून पत्नीने आपल्या पतीचा खून केल्याची घटना उघडकीला आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

जयपूर, 30 ऑक्टोबर : वडिलोपार्जित जमीन विकण्याच्या (Wife kills husband in dispute over ancestral land) वादातून पत्नीने आपल्या पतीचा खून केल्याची घटना उघडकीला आली आहे. धक्कादायक म्हणजे महिलेचा मुलगा आणि दीर (Son and brother in law helped woman to kill her husband) यांनीदेखील पतीच्या हत्येत सहभाग घेतला. तिघांनी मिळून पतीची हत्या केली आणि त्याचा मृतदेह जाळून टाकत पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. काय आहे प्रकरण? राजस्थानमधील करौली भागात राहणाऱ्या किरौडी नावाच्या व्यक्तीकडे वडिलोपार्जित शेती होती. त्याची पत्नी शीतलबाई, भाऊ गोविंद आणि मुलगा जितेंद्र यांच्यासोबत त्याचे सतत वाद होत असत. गेल्या काही वर्षात कर्जबाजारी झालेल्या किरौडीकडे उत्पन्नाचं काहीही साधन नव्हतं. शेतीतून मिळणारं उत्पन्न हे कर्ज फेडण्यासाठी पुरेसं नसल्यामुळे ती जमीन विकून कर्ज फेडण्याचा विचार किरौडी करत होता. मात्र त्याची पत्नी आणि मुलाला ही बाब मान्य नव्हती. भाऊ गोविंदचाही ही जमीन विकायला विरोध होता. भांडणानंतर खून घटनेच्या दिवशी याच विषयावरून किरोडीचं त्याच्या पत्नीसोबत कडाक्याचं भांडण झालं. त्यानंतर पत्नीने किरोडीला दांडक्याने मारहाण केली. तिच्यासोबत मुलाने आणि भावानेदेखील त्याच्यावर वार केले. लाठाकाठ्यांनी मारून किरोडीला जखमी करण्यात आले. त्यातील काही वार वर्मी लागल्याने किरोडीचा मृत्यू झाला. हे वाचा- लैंगिक चाळे करणाऱ्या विकृताला अद्दल, मार्शल आर्टिस्ट महिलेनं शिकवला धडा पुरावे मिटवण्याचा प्रयत्न किरौडीचा मृत्यू झाल्यावर पत्नी आणि इतरांनी त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा निर्णय़ घेतला. घरासमोर असणाऱ्या शेतात चिता रचून किरौडीचा मृतदेह जाळण्यात आला. मात्र किरौडीच्या लांबच्या नातेवाईकाने त्याचा खून झाल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी तिघांनाही अटक केली असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात