ब्राझील, 30 ऑक्टोबर: बसमध्ये लैंगिक चाळे करत (Girl used martial art to bring a criminal on his feet) लगट करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या तरुणाला तरुणीनं चांगलाच धडा शिकवला. मार्शल आर्टिस्ट असणाऱ्या या (Girl hold youth from back and chocked his neck in running bus) तरुणीनं नराधमाला पाठिमागून ‘चोक’ करत घट्ट पकडलं आणि त्याला गुडघ्यावर आणलं. चालत्या बसमध्ये घडणाऱ्या या थराराचं अनेकांनी व्हिडिओ शूटिंग केलं. विकृताकडून गर्दीचा फायदा ब्राझीलमध्ये गर्दीने खचाखच भरलेल्या बसचा गैरफायदा घेत एका तरुणानं तरुणीच्या पाठिमागून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याने आपल्या पँटची झीपदेखील खाली केल्याचं पोलिसांच्या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. मात्र हा प्रकार तो ज्या महिलेसोबत करत होता, ती मार्शल आर्टिस्ट होती आणि जिमवरून घरी परतत होती. हा प्रकार सहन न झाल्याने तिने या विकृत तरुणाला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. तरुणाला टाकला ‘बॅक स्लॅम’ Muay Thai आणि capoeira या क्रीडा प्रकारांमध्ये निपुण असणाऱ्या या मार्शल आर्टिस्टनं क्षणाचाही विलंब न करता नराधमाची पकड घेतल. त्याच्या पाठिमागून वीजेच्या चपळाईनं त्याला पकडलं आणि त्याचा गळा दाबत त्याला गुडघ्यावर आणलं. त्यानंतर बसच्या ड्रायव्हरला गाडी पोलीस स्टेशनपाशी थांबवायला सांगितली. पोलीस स्टेशनला जाऊन विकृत नराधमाला पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतरच या तरुणीनं त्याच्या मानेवरची पकड सोडली. मार्शल आर्टचा झाला फायदा तरुणीने खेळाविषयी असणाऱ्या आवडीतून मार्शल आर्ट शिकण्याचा निर्णय घेतला होता. शारीरिक आणि मानसिक फिटनेस उत्तम ठेवणं आणि स्वतःचं संरक्षण करणं या उद्देशाने तिनं मार्शल आर्टचं शिक्षण घेतलं आहे. याचा प्रत्यक्ष फायदा तिला या घटनेत झाल्याचं दिसून आलं. मात्र बसमधील सहप्रवासी हे मदत करण्याऐवजी मोबाईलवर चित्रिकरण करण्यातच धन्यता मानत असल्याबद्दल तिनं आश्चर्यही व्यक्त केलं आहे. हे वाचा- हिवाळ्यात ट्रेकिंगचा प्लॅन करताय? मग ‘ही’ आहेत भारतातील सर्वोत्तम ठिकाणे पोलीस करतायत तपास पोलिसांनी या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या तरुणाने पूर्वीदेखील अशाच प्रकारचे गुन्हे केल्याचं पोलिसांना आढळून आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.