जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / सर्वपित्री अमावास्येच्या रात्री भोंदू मांत्रिकाचं तरूणींवर अघोरी कृत्य, घराचं दार उघडताच पोलीस हादरले!

सर्वपित्री अमावास्येच्या रात्री भोंदू मांत्रिकाचं तरूणींवर अघोरी कृत्य, घराचं दार उघडताच पोलीस हादरले!

सर्वपित्री अमावास्येच्या रात्री भोंदू मांत्रिकाचं तरूणींवर अघोरी कृत्य, घराचं दार उघडताच पोलीस हादरले!

मुरबाडमधून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुरबाड, 26 सप्टेंबर : सर्वपित्री अमावास्येच्या रात्री भूत आणि करणीची बाधा झालेल्या तरुणीवर तंत्रमंत्र विदयेच्या द्वारे भयानक अघोरी कृत्य करणाऱ्या भोंदू मांत्रिकाचा डाव गावकऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने उधळून लावला आहे. ही घटना मुरबाड तालुक्यातील सोनगावातील एका घरात घडली आहे. याप्रकरणी टोकावडे पोलीस ठाण्यात कलम 34, सह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणाप्रतिबंध, समुळ उच्चाटन, अधिनियम 2013 चे कलम  3(2),  3 (3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येऊन दोन भोंदू मांत्रिकासह त्याचे पाच साथीदार आणि दोन तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. काजी दाउद शेख, बंधू तुकाराम वाघ, असे अटक भोंदू मांत्रिकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुरबाड तालुक्यातील सोनगावातील रशीद फकीर शेख यांच्या बंद घरात सर्वपित्री अमावास्येच्या रात्री नऊ ते साडे नऊ वाजल्याच्या सुमारास भूत आणि करणीची बाधा झालेल्यावर तंत्रमंत्र विदयेच्या द्वारे भयानक अघोरी कृत्य सुरू असल्याची माहिती शेजारीने गावातील पोलीस पाटलांना दिली. त्यानंतर गावकऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने घराचा दरवाजा उघडताच, घरामधील अघोरी दृश्य पाहून गावकऱ्यांना धक्काच बसला होता. घरातील एका खोलीत दोन तरुणी व भोंदू मांत्रिक आणि त्याचे साथीदार अघोरी पूजेचे साहित्य लिंबू, मिरची, गुलाल अभीर अगरबत्ती, नारळ इत्यादी असे साहित्य ठेवून त्या तरुणीवर अघोरी कृत्य करताना घरात दिसून आल्याने गावकऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने भोंदू मांत्रिक त्याचे साथीदार आणि तरुणींना पंचनामा करून घरातील अघोरी पूजेचे साहित्य जप्त केले. वाशिम : लग्नाचे आमिष देत गावातील तरुणाने दोन महिने ठेवले शारीरिक संबंध, नंतर महिलेसोबत धक्कादायक प्रकार तर संजय लक्ष्मण भोईर, (वय 40 ) यांच्या तक्रारीवरून टोकावडे पोलीस ठाण्यात भोंदू मांत्रिकासह त्यांच्या साथीदार गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी काजी दाउद शेख, बंधू तुकाराम वाघ, विजय बंधू वाघ भोंदू मांत्रिकासह साईनाथ गोपाळ कदम, (वय 36 ) गणेश पोपटराव देशमुख, (वय 36 ) दत्तात्रेय बाळकृष्ण चौधरी (वय 36) गणेश रामचंद्र शेलार, (वय 32 ) यांनाही ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे नाशिकवरून आणखी एक मांत्रिक अघोरी पूजेसाठी येणार असल्याची माहिती ताब्यात घेतलेल्या आरोपींनी पोलिसांना दिली आहे. देहव्यापार करणारी प्रेयसी दारू पिऊन घरी आली, प्रियकराने आवळला गळा, मृतदेह घेऊन निघाला कर्नाटकला पण… आता पोलीस त्याही भोंदू मांत्रिकाच्या शोधात असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे काल रात्री अटक केलेल्या भोंदू मांत्रिक काजी दाउद शेख आणि बंधू तुकाराम वाघ, यांच्यावर यापूर्वी 2009 मध्ये नरबळीचा गुन्हा दाखल असून त्यावेळी त्यांना पोलिसांनी अटक केली होती. काल रात्री पुन्हा याच दोन्ही भोंदू मांत्रिकांनी दोन तरुणीवरील भूतबाधा व करणीच्या नावाने अमानुष आणि अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रकारची कृत्य साथीदारांशी संगनमत करून केल्याने त्यांच्यावरही विविध कलमानुसार गुन्हा दाखल केल्याची माहिती सहा. पोलीस निरीक्षक संतोष दराडे, यांनी दिली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक संतोष दराडे, करीत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात