इंदूर, 15 एप्रिल : एका महिलने आपल्या 72 वर्षांच्या पतीची हत्या (husband murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वृद्ध महिला इतकी चलाख आहे की तिने मुंबईत आपल्या पतीची हत्या केल्यानंतर मध्यप्रदेशातील इंदूर (indore) येथे येऊन एका शेतात आपल्या पतीचा मृतदेह जाळला. यात महिलेला तिच्या मुलीने आणि जावयानेदेखील मदत केल्याचे समोर आले आहे. सम्पत्तलाल मिश्रा असे मृताचे नाव आहे. ते मुंबईत राहत होते. दरम्यान, या प्रकारानंतर मृताची पत्नी आणि तिची मुलगी, जावयाला पोलिसांनी अटक केली आहे. इंदूरच्या राजेंद्र नगर पोलीस ठाणे परिसरातील निहालपूर मुंडीत एका शेतात, सुटकेसमध्ये मृतदेह आढळून आला होता. यानंतर पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर ते लगेच घटनास्थळी दाखल झाले. तपासादरम्यान सीसीटीव्हीच्या माध्यमातून माहिती समोर आली. ज्या माहितीच्या आधारे पोलीस मुंबईत पोहोचले. यानंतर अशी माहिती समोर आली आहे की, सम्पतलालचे आपली पत्नी राजकुमारी मिश्रासोबत दररोज भांडण होत होते. घटनेच्या रात्री संपतलालने राजकुमारीला मारहाण करण्यास सुरुवात केली. रागाच्या भरात तिने त्याला ढकलले आणि जवळच पडलेल्या मोगरी त्याच्या डोक्यावर मारली. यानंतर तो तिथेच बेशुद्ध झाला आणि त्याचा तिथेच मृत्यू झाला. यानंतर त्यानंतर आरोपी पत्नी राजकुमारी हिने आपली मुलगी आणि जावयाच्या मदतीने मृतदेहाची विल्हेवाट लावली. तिचा जावई उमेश शुक्ला एक जवळच्या कंपनीत इंजीनिअर आहे. त्याला नोकरीच्या निमित्ताने भोपाळ येथे एका बैठकीला यायचे होते. यामुळे तिघांनीही मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा कट रचला. एक मोठी सुटकेस विकत घेतल्यानंतर त्यात मृतदेह ठेवला. यानंतर ती सुटकेस गाडीच्या ट्रंकमध्ये ठेवली. हेही वाचा - VIDEO : वृद्ध जोडप्याचं भांडणं थेट पोलीस ठाण्यात पोहोचलं; मग पोलिसांनी जे केलं ते पाहून व्हाल अवाक
प्रवासात त्यांनी अनेक ठिकाणी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना हवी तशी संधी मिळाली नाही. इंदूरमध्ये पोहोचले तेव्हा सकाळचे चार वाजत होते. त्यामुळे आता जर मृतदेहाची विल्हेवाट लावली नाही तर परिस्थिती त्यांच्या अंगलट येऊ शकते, अशी त्यांना भीती होती. यामुळे इंदूरमध्ये पोहोचताच त्यांनी बायपासच्या आत जाऊन एका रिकाम्या शेतात तिघांनी मृतदेह ठेवलेली सुटकेस बाहेर काढली. यानंतर त्या सुटकेसवर पेट्रोल टाकत त्याला जाळून टाकले आणि ते तिघे तिथून फरार झाले.
अशी केली आरोपींना अटक -
तपासादरम्यान घटनास्थळाजवळ बसवण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये पोलिसांना एक कार आढळली. सीसीटीव्हीमध्ये कारचा नंबर दिसत नव्हता. त्यामुळे टोलनाक्यावरून वाहन क्रमांक आणि त्याच्या मालकाचा पत्ता सापडला. भोपाळला पोहोचल्यानंतर पोलिसांनी उमेश शुक्लाला मीटिंगमधून ताब्यात घेतले आणि नंतर त्याची पत्नी आणि सासूलाही अटक केली.