मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

महिलेने घरातील सर्व दारू संपवली; पतीचा संताप, दुसऱ्या दिवशी दारात आढळला पत्नीचा मृतदेह

महिलेने घरातील सर्व दारू संपवली; पतीचा संताप, दुसऱ्या दिवशी दारात आढळला पत्नीचा मृतदेह

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

महिलेने पतीसाठी दारू ठेवली नाही, तिनेच सर्व दारू रिचवली.

    रायपूर, 26 डिसेंबर : छत्तीसगडमधील (Chhattisgarh News) कोरबा जिल्ह्यात पतीने पत्नीची हत्या (Killed Wife) केल्याची बाब समोर आली आहे. पत्नीच्या हत्येचं कारण वाचून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. पत्नीने पतीसाठी दारू ठेवली नाही. यानंतर पतीने तिला बेल्टने मारहाण केली आणि घराबाहेर काढलं. यानंतर महिला रात्रभऱ घराच्या बाहेरच होती. (wife drank all the alcohol Husband beat her with belt and took her out of the house dead body was found in the morning) त्यात बाहेर थंडी जास्त होती. सकाळी पतीने दार उघडलं तर पत्नीचा मृतदेह दिसला. मिळालेल्या माहितीनुसार, छिंदकोना निवासी जीरोन किस्पोट्टा आपली पत्नी प्रेमा किस्पोट्टासोबत राहत होता. दोघांनाही दारूची सवय होती. त्यामुळे अधिकतर वेळेस दोघेही एकत्र दारू पित असे. अनेकदा प्रेमा घरातच दारू बनवित असे. काहीवेळा ती दारूची विक्री देखील करती होती. पत्नी स्व:च प्यायली सर्व दारू.. शनिवारी प्रेमाने घरातच दारू तयार केली होती. त्यावेळी तिच्या पतीने त्याच्यासाठी दारू ठेवण्यास सांगितलं. आणि तो कामावर निघून गेला. रात्री जेव्हा तो परतला तर त्याने पाहिलं की घरातील दारू संपली होती. त्याने प्रेमाला याबद्दल विचारलं तर तिने काहीच उत्तर दिलं नाही. तर ती स्वत:च दारूच्या नशेत होती. जीरोनला लक्षात आलं की, पत्नीने सर्व दारू संपवली. हे ही वाचा-अपहरण केलं, खंडणीही मिळाली पण एक चूक पडली महागात; वाचा काय घडलं... आत जाऊन खोलीत झोपला.. जीरोन बऱ्याचदा विचारत असतानाही प्रेमा काहीच उत्तर देत नव्हती. यामुळे जीरोनला राग आला आणि तो बेल्ट घेऊन प्रेमाला मारू लागला. त्याने तिला इतकं मारलं की, तिच्या अंगावर चट्टे पडले. मारहाण केल्यानंतर तिला बेशुद्ध अवस्थेत बाहेर सोडलं आणि दार बंद करून खोलीत झोपला. सकाळी उठल्यावर तो घराबाहेर गेला तर प्रेमाचा मृतदेह पडला होता. या भागात खूप थंडी असते. त्यामुळे थंडी आणि मारहाणीमुळे प्रेमाचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सकाळी आजूबाजूच्या लोकांनी प्रेमाचा मृतदेह पाहिला. आणि पोलिसांना याबाबत माहिती दिली. यानंतर पोलिसांची टीम घटनास्थळी पोहोचली आणि रविवारी सकाळी आरोपीला अटक केली.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Chattisgarh, Murder

    पुढील बातम्या