मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /अपहरण केलं, खंडणीही मिळाली पण एक चूक पडली महागात; वाचा काय घडलं...

अपहरण केलं, खंडणीही मिळाली पण एक चूक पडली महागात; वाचा काय घडलं...

आपलं कर्ज फेडण्यासाठी एका कपलनं अपहरणाचा डाव रचला आणि तो यशस्वीही केला. मात्र त्यानंतर एक गोष्ट त्यांना भलतीच महागात पडली.

आपलं कर्ज फेडण्यासाठी एका कपलनं अपहरणाचा डाव रचला आणि तो यशस्वीही केला. मात्र त्यानंतर एक गोष्ट त्यांना भलतीच महागात पडली.

आपलं कर्ज फेडण्यासाठी एका कपलनं अपहरणाचा डाव रचला आणि तो यशस्वीही केला. मात्र त्यानंतर एक गोष्ट त्यांना भलतीच महागात पडली.

नवी दिल्ली, 25 डिसेंबर: एका तरुणीनं (Young Girl) व्यापाऱ्याच्या (Businessman) मुलाचं अपहरण (Kidnap) करून खंडणी (Ransom) उकळल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे. तरुणीनं तिचा बॉयफ्रेंड, आई आणि भाडोत्री गुंडाच्या (Boyfriend, Mother and rented criminal) मदतीनं बॉसच्या मुलाचं अपहरण करण्याचा डाव रचला आणि तो तडीस नेला. विश्वासातील माणसं जेव्हा अशा गुन्ह्यात सहभागी असतात, तेव्हा ते गुन्हे रोखणं किंवा त्यातून सुटका करून घेणं सहजासहजी शक्य होत नाही. हाच अनुभव अपहरण केलेल्या तरुणाला आला.

कर्जासाठी अपहरण

दिल्लीतील पटपडगंज भागातील एका व्यापाऱ्याकडे काम करणाऱ्या ऋचा नावाच्या तरुणीने तिचा बॉयफ्रेंड गुरमीतच्या मदतीने व्यापाऱ्याचा मुलगा किंसुखचं अपहरण करण्याचा डाव रचला. यातून मिळणाऱ्या पैशातून आपलं कर्ज फेडायचं आणि परदेशात स्थायिक व्हायचं, असा त्यांचा प्लॅन होता. त्यासाठी त्यांनी पूर्ण योजना आखली आणि तडीस नेली

असं केलं अपहरण

व्यापाऱ्याचा मुलगा किंसुख आणि ऋचा हे एकत्र काही खरेदी करण्यासाठी बाजारात आले होते. वस्तू घेऊन पुन्हा गाडीत बसताना अगोदरच ठरल्याप्रमाणे तिचा बॉयफ्रेंड गुरमीत तिथं आला आणि टॉय गनच्या आधारे त्यानं किंसुखचं अपहरण केलं. हे अपहरण खरं वाटावं यासाठी ऋचाने मुद्दाम किंकाळ्या फोडल्या आणि आरडाओरडा केला.

मागितली खंडणी

किंसुखला सोडून देण्यासाठी त्यांनी व्यापाऱ्याकडे 1 कोटींची खंडणी मागितली आणि शेवटी 50 लाखांवर सौदा ठरला. सौद्याची रक्कम देण्यासाठी व्यापारी ठरलेल्या ठिकाणी आला. त्याने अपहरणकर्त्यांना रक्कम दिली आणि गुरमीतने किंसुख, ऋचा आणि ड्रायव्हरची सुटका केली.

हे वाचा - मित्रांनी Cold Drink मधून तरुणीला दिलं गुंगीचे औषध अन्‌...

महागात पडली चूक

अपहरणाचा डाव यशस्वी झाल्यानंतर आणि पैसे ताब्यात मिळाल्यानंतर तिथून पोबारा करण्याऐवजी गुरमीतने व्यापाऱ्याला गाडीत बसवले आणि शहरातील वेगवेगळ्या भागातून फिरवले. त्यानंतर मात्र व्यापाऱ्याने याची पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी ज्या ज्या भागात ही गाडी फिरली तिथलं सीसीटीव्ही फुटेज शोधून अपहरणनाट्याचा उलगडा केला आणि सर्वांना अटक केली.

First published:
top videos

    Tags: Crime, Delhi, Kidnapping