मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

बलात्कारामुळे पत्नीने आत्महत्या केल्यानंतर 6 व्या दिवशी पतीनेही घेतला गळफास, उस्मानाबाद हादरलं

बलात्कारामुळे पत्नीने आत्महत्या केल्यानंतर 6 व्या दिवशी पतीनेही घेतला गळफास, उस्मानाबाद हादरलं

osmanabad suicide :आत्महत्या करण्यापूर्वी या व्यक्तीने एक व्हिडीओ समाजमाध्यमात शेअर केला आहे.

osmanabad suicide :आत्महत्या करण्यापूर्वी या व्यक्तीने एक व्हिडीओ समाजमाध्यमात शेअर केला आहे.

osmanabad suicide :आत्महत्या करण्यापूर्वी या व्यक्तीने एक व्हिडीओ समाजमाध्यमात शेअर केला आहे.

उस्मानाबाद, 08 मार्च : बंदुकीचा धाक दाखवून एका बलात्कार केल्यानंतर महिलेनं आत्महत्या (Osamanabad Suicide) केल्याची धक्कादायक घटना उस्मानाबादेत घडली होती. पीडित महिलेच्या आत्महत्येनंतर तिच्या पतीने सुद्धा गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तम शिंदे असे त्या आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. विशेष म्हणजे, आत्महत्या करण्यापूर्वी या व्यक्तीने एक व्हिडीओ समाजमाध्यमात शेअर केला आहे. या व्हिडिओत या आत्महत्येस पोलीस कर्मचारी हरिभाऊ कोळेकर (Haribhau Kolekar) व सासरची मंडळी जबाबदार असल्याचे मत त्याने व्यक्त केले आहे.

'माझे हसते खेळत कुटुंब हरिभाऊ कोळेकर याने उद्धवस्त केले आहे. माझी पोलिसांमध्ये ओळख आहे, तुम्ही काहीही करू शकत नाही अशी धमकी कोळेकर देत होता. माझ्या पत्नीला त्याने फसवून बलात्कार (rape) केला, त्याच्या छळाला कंटाळून आत्महत्या (suicide) केली. माझ्या पत्नीच्या आत्महत्येस जबाबदार (responsible)असलेल्या हरिभाऊ कोळेकरला फाशी (death sentence) झालीच पाहिजे, अशी इच्छा उत्तम (last wish) यांनी सुसाईट नोटमध्ये (suicide note) लिहून ठेवली.

महिला दिन वर्षातून एकदाच का साजरा करायचा? राज ठाकरेंची पोस्ट व्हायरल

तसंच, माझ्या सासरच्या मंडळीने सुद्धा मला त्रास दिला आहे. त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे, असंही त्यांनी या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.

2 मार्च रोजी पीडित महिलेनं आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी पीडित महिलेनं एक सुसाईट नोट लिहून ठेवली होती. 'मी माझ्या मर्जीने आत्महत्या करत आहे . याला जबाबदार हरिभाऊ रामदास कोळेकर असणार आहे. मी फाशी घेणार आहे, त्या कोळेकरच्या घरी कारण त्यानेच माझे वाटोळे केले. त्याने माझा पहिल्यांदा घरी येऊन रेप केला व त्याआधारे मला सारखे धमकावत होता, बंदुकीचा धाक दाखवून...यात माझ्या नवऱ्याचा काय दोष नाही,' असं मृत महिलेने आपल्या सुसाईड नोटमध्ये म्हटलं होतं.

या प्रकरणी पोलीस नाईक हरिभाऊ कोळेकर याच्यावर उस्मानाबाद शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

राफेल लढाऊ विमान बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाचा हेलिकॉप्टर अपघातामध्ये मृत्यू

दरम्यान, पोलीस हे समाजाचे रक्षणकर्ते म्हणून ओळखले जातात. मात्र याप्रकरणात पोलिसावरच बलात्काराचा आणि आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप झाल्याने शहरात संतापाची लाट उसळली. याप्रकरणी सखोल चौकशी होऊन दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून करण्यात येत आहे.

First published:

Tags: Crime, Crime news, Death Sentence, Husband suicide, Rape, Woman suicide