मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

गर्लफ्रेंडसोबत रोमान्स करणाऱ्या पतीला पत्नीने रंगेहाथ पकडले, वाचा नंतर काय घडलं?

गर्लफ्रेंडसोबत रोमान्स करणाऱ्या पतीला पत्नीने रंगेहाथ पकडले, वाचा नंतर काय घडलं?

त्यांना एक 16 वर्षांची मुलगीही आहे.

त्यांना एक 16 वर्षांची मुलगीही आहे.

त्यांना एक 16 वर्षांची मुलगीही आहे.

  • Published by:  News18 Desk
आगरा, 21 सप्टेंबर : आगरा जिल्ह्यातील एका हॉटेलमध्ये पती-पत्नीचा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. एक पती आपल्या प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये रोमान्स करत होता. यावेळी त्याच्या पत्नीने त्याला रंगेहाथ पकडले. पती आपल्या प्रेयसीसोबत त्याठिकाणी होता. तेव्हाच पत्नी तेथे पोहोचली आणि तिने तिचा नवरा आणि त्याच्या प्रेयसी दोघांनाही मारहाण केली. हॉटेलमधील या गोंधळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - हा हायव्होल्टेज ड्रामा हरिपर्वत परिसरातील एका हॉटेलमध्ये घडला आहे. याठिकाणी एक व्यक्ती आपल्या प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये गेला होता. बायकोला कुठूनतरी याची माहिती मिळाली होती. त्यानंतर तिने भावासोबत हॉटेलमध्ये जाण्याची धमकी देत ​​गोंधळ घातला. पत्नीने पती आणि त्याच्या प्रेयसीला चप्पलने बेदम मारहाण केली. हॉटेलमध्ये अनेक तास हाय व्होल्टेज ड्रामा असाच सुरू होता. महिलेचे लग्न होऊन अनेक वर्षे झाली आहेत. तर तिचा पती नर्सिंग होममध्ये काम करतो. त्यांना एक 16 वर्षांची मुलगीही आहे. पतीच्या कृत्यांमुळे पत्नी नेहमी त्रस्त असते. यामुळेच ती माहेरी राहत आहे. पण ती सतत नवऱ्यावर लक्ष ठेवते. यादरम्यान तिला पती हॉटेलमध्ये असल्याची माहिती मिळाली होती. जिथे ती तिच्या भावासोबत पोहोचली आणि दोघांनाही बेदम मारहाण केली. रात्री उशिरापर्यंत हॉटेलमध्ये गोंधळ सुरू होता. हेही वाचा - लिव्ह इन रिलेशनशिपनंतर शुभमंगल सावधान, एका नात्यामुळे तरुणाचा भयावह शेवट व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पत्नी पती आणि त्याच्या मैत्रिणीला चप्पलने मारहाण करताना दिसत आहे. पती माफी मागत राहिला. मात्र, पत्नीने त्याला मारहाण केली. पत्नीने प्रेयसीच्या नवऱ्यालाही फोन केला. त्यानंतर 112 वर फोन करून पोलिसांना माहिती देण्यात आली. या दरम्यान, हॉटेलमध्ये मोठ्ठा गोंधळ उडाला होता.
First published:

Tags: Agra, Crime news, Women extramarital affair

पुढील बातम्या