जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / लिव्ह इन रिलेशनशिपनंतर शुभमंगल सावधान, एका नात्यामुळे तरुणाचा भयावह शेवट

लिव्ह इन रिलेशनशिपनंतर शुभमंगल सावधान, एका नात्यामुळे तरुणाचा भयावह शेवट

लिव्ह इन रिलेशनशिपनंतर शुभमंगल सावधान, एका नात्यामुळे तरुणाचा भयावह शेवट

2019 मध्ये लोकेशच्या पत्नीचा मृत्यू झाला होता.

  • -MIN READ Rajasthan
  • Last Updated :

दौसा, 20 सप्टेंबर : राजस्थानमधील दौसा जिल्ह्यातील सदर पोलीस स्टेशन परिसरात एका तरुणाला तरुणीसोबत लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहिल्यानंतर प्रेमविवाह करणे चांगलेच महागात पडले आहे. त्यामुळे तणावात येऊन या तरुणाने मंगळवारी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने सुसाईड नोटही लिहिली. यात त्याने आपली पत्नी आणि सासरच्या मंडळीनी त्याच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप केला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - सुसाईड नोटमध्ये तरुणाने आपली व्यथा लिहिली आणि आरोपींना शिक्षा झाल्यानंतरच अंतिम संस्कार करावेत, असे म्हटले आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. सदर एसएचओने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रामपुरा गावातील आहे. याठिकाणी लोकेश शर्मा याने खोलीत गळफास घेत आत्महत्या केली. त्याच्या खिशातून सुसाईड नोट सापडली आहे. या सुसाईड नोटमध्ये लोकेशने लिहिले की, 2019 मध्ये त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर तो 2020 पासून ज्योती नावाच्या महिलेशी बोलायचा. यानंतर मार्च 2022 पासून ज्योती त्याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागली. त्यानंतर जुलै महिन्यात दोघांनी न्यायालयात जाऊन लग्न केले होते. हा प्रकार ज्योतीचे वडील जगदीश यांना कळला. यावर ज्योतीचे वडील जगदीश आणि मामाचा मुलगा अजय यांनी तिचा छळ सुरू करत त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. यासोबतच ज्योती आणि तिच्या वडिलांनी त्याच्या आयुष्यभराची कमाई हिसकावून घेतली. लोकेशने सुसाईड नोटमध्ये असेही सांगितले की, आपण त्याच्या नातेवाईकांकडून पैसे आणून ज्योती आणि तिच्या वडिलांना दिले. असे असूनही सर्व नातेवाईकांमध्ये त्याला बदनाम करण्यात आले. हेही वाचा -  गंमत म्हणून होणाऱ्या बायकोचा न्यूड फोटो सोशल मीडियावर टाकला, तरुणीने घेतला भयंकर बदला सुसाईड नोटमध्ये व्यक्त केली इच्छा -  ज्योती, तिचे वडील जगदीश आणि मामाचा मुलगा अजय यांना शिक्षा झाल्यानंतरच त्याच्यावर अंत्यसंस्कार करावेत, असे लोकेशने सुसाईड नोटमध्ये पुढे लिहिले आहे. तसेच त्याने सुसाईड नोटमध्ये आई आणि भावाची माफीही मागितली आहे. ट्रॉली बॅगमध्ये पेन ड्राईव्हमध्ये त्याचे आणि ज्योतीच्या नात्याचे फोटो आणि व्हिडिओ असल्याचा दावाही सुसाईड नोटमध्ये करण्यात आला आहे. पोलिसांनी वैद्यकीय मंडळाकडून शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला आहे. सध्या पोलीस सुसाईड नोटच्या आधारे संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात