मुंबई, 24 मे: देशात विवाह बाह्य संबंधांची प्रकरणं दिवसेंदिवस वाढू लागली आहेत. यामुळे देशात गुन्हेगारी आणि गुन्ह्यांच्या (Crime News) प्रकरणांमध्येही वाढ झाली आहे. पुरुषांचं लग्नानंतरही इतर महिलांनाही प्रेम जुळतं तर अशाच गोष्टी महिलांच्या बाबतीतही लागू होतात. मात्र अशा प्रकरणांचा उद्रेक झाला की भयंकर गोष्टी समोर येतात. अशीच एक घटना पश्चिम बंगाल (Crime in West Bengal) राज्यातील हुगली इथे घडली आहे. काही दिवसांपूर्वी उत्तर 24 परगनाच्या पानीहाटी या भागात राहणाऱ्या शुभज्योति बसु नावाच्या एका पंचवीस वर्षीय युवकाचा धड आणि डोकं वेगळा केलेला मृतदेह पोलिसांना सापडला होता. याचाच तपास करताना पोलिसांसमोर धक्कादायक माहिती उघड झाली. Breaking: दाऊद इब्राहिमचा लागला ठावठिकाणा; भाच्यानं केला मोठा खुलासा
काही दिवसांपूर्वी शुभज्योति बसु याचं लग्न झालं होतं. मात्र यानंतर त्याचं आपल्या पत्नीच्या एका मैत्रिणीवर प्रेम जडलं होतं. त्यानं तिच्यासमोर प्रेम व्यक्तही केलं होतं. मात्र त्याच्या पत्नीची मैत्रीण शर्मिष्ठा हिनं शुभज्योतिला साफ नकार दिला आणि घडलेली सर्व घटना आपल्या पतीला सांगितली. तसंच शुभज्योतिच्या पत्नीलाही या घटनेची माहिती मिळाली.
हा सर्व प्रकार समजल्यानंतर शुभज्योतिची पत्नी आणि शर्मिष्ठाचा पती हे दोघेही प्रचंड चिडले आणि त्यांनी शुभज्योतिला चांगलीच अद्दल घडवण्याचा निश्चय केला. यानंतर या सर्वांनी मिळून शुभज्योतिला जीवे मारण्याचा प्लॅन तयार केला. यासाठी त्यांनी शुभज्योतिला एका दारूच्या भट्टीत नेऊन मोठ्या प्रमाणात दारू पाजली. जेव्हा शुभज्योति दारूच्या नशेत गेला यानंतर शर्मिष्ठाचा सुवीर अधिकारी याने धारदार शस्त्रांनी शुभज्योतिचं डोकं धडापासून वेगळं केलं. हे भयंकर कृत्य केल्यानंतर त्यांनी शुभज्योतिच्या डोक्याला नदीत फेकून दिलं आणि त्याचं धड व्हॅनमध्ये घालून ड्रेनमध्ये फेकून दिलं. धारदार हत्याराने वार करत माय लेकीचा झोपेतच केला खून,धक्कादायक घटनेनं धुळे हादरलं पोलिसांना शुभज्योतिचं शीर मिळालं तेव्हा त्याची ओळख पटवणं अशक्य दिसत होतं. मात्र धड मिळाल्यानंतर त्याच्या अंगावरील टॅटूमुळे शुभज्योतिची ओळख पटवणं सोपं झालं. यानंतर पोलिसांना या प्रकरणाचा छडा लावण्यात जराही वेळ लागला नाही. यानंतर पोलिसांनी शुभज्योतिची पत्नी चंदना तिची मैत्रिण पूजा चटर्जी, शर्मिष्ठा, भास्कर अधिकारी आणि मैत्रिणीचा नवरा सुवीर अधिकारी यांना लगेच अटक केली आहे.