मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /Dhule Crime : धारदार हत्याराने वार करत माय लेकीचा झोपेतच केला खून,धक्कादायक घटनेनं धुळे हादरलं

Dhule Crime : धारदार हत्याराने वार करत माय लेकीचा झोपेतच केला खून,धक्कादायक घटनेनं धुळे हादरलं

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

Dhule crime: घराबाहेर झोपलेल्या माय-लेकीवर धारदार हत्याराने वार करत खून (Mother-Daughter Murder) करण्यात आला आहे. ही धक्कादायक घटना धुळे तालुक्यातील तरवाडे (Tarwade Dhule) गावात सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली.

धुळे, 24 मे : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ (Crime Incidence Increasing in Maharashtra) होत असल्याचे पाहायला मिळत आहे. कोणत्या ना कोणत्या कारणावरुन मारहाण, तसेच खून (Murder) केल्याच्याही घटना घडत आहेत. आता धुळ्यातील मायलेकीसोबत (Mother-Daughter) एक धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे.

माय लेकीचा खून - 

घराबाहेर झोपलेल्या माय-लेकीवर धारदार हत्याराने वार करत खून (Mother-Daughter Murder) करण्यात आला आहे. ही धक्कादायक घटना धुळे तालुक्यातील तरवाडे (Tarwade Dhule) गावात सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली. चंद्रभागा भाऊराव महाजन (वय 65) आणि वंदना गुणवंत महाले अशी मृत आई आणि मुलीची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्यासह इतर पोलीस अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांचा मोठा फौजफाटा याठिकाणी दाखल झाला. परिसरातील नागरिकांनीही याठिकाणी मोठी गर्दी केली होती.

मृत चंद्रभागा भाऊराव महाजन यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. त्या आपल्या मुलांपासून वेगळ्या राहत होत्या. त्या तरवाडे शिवारात धुळे-सोलापूर मार्गावर एका पत्रटी शेडमध्ये अल्पोपहाराचं हॉटेल टाकून आपला उदरनिर्वाह भागवायच्या. हॉटेलमधल्याच एका भागातच वास्तव्यास होत्या. तर दुसरीकडे त्यांची मुलगी वंदना ही जळगाव जिल्ह्यातील आडगाव येथे राहते. मात्र, मागील दोन महिन्यांपासून त्यासुद्धा कौटुंबिक कलहामुळे आपली आई चंद्रभागा महाजन यांच्याकडे राहत होत्या.

हेही वाचा - प्रेयसीसोबत संभोग करताना प्रियकराचा मृत्यू, मुंबईतील खळबळजनक प्रकार

श्वानपथकालाही पाचारण - 

सोमवारी सकाळच्या सुमारास चंद्रभागा यांचा नातू दूध घेण्यासाठी हॉटेलमध्ये आला होता. यावेळी त्याला या दोघींचा मृतदेह खाटेवर दिसून आला. त्याने ही माहिती इतर नागरिकांना दिली. यानंतर घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्यासह इतर पोलीस अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा खुलासा अजून झालेला नाही. पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. दरम्यान, मायलेकीच्या या खूनाने एकच खळबळ उडाली आहे.

First published:

Tags: Crime, Daughter, Dhule, Mother killed, Murder