शिर्डी, 29 नोव्हेंबर : साईबाबांच्या शिर्डीतून (Shirdi) अनेकजण बेपत्ता होत असल्याची माहितीसमोर आल्याने खळबळ उडाली आहे. यात मानवी अवयव तस्करीचे काही रॅकेट (Human organ trafficking) आहे की काय? असा सवाल उच्च न्यायालयाने (High Court) उपस्थित केला आहे. यामुळे साईभक्त मात्र धास्तावले आहेत.
मध्यप्रदेशातील इंदूर (Madhya Pradesh, Indore)येथील मनोज सोनी (Manoj Soni) यांची पत्नी दिप्ती सोनी (Dipati soni )ही शिर्डीतून तीन वर्षांपूर्वी बेपत्ता झाली. त्यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आणि स्वतःही अनेक ठिकाणी तीचा शोध घेतला. मात्र अजूनही ती सापडलेली नाही.
प्रियकराला कंटाळून मुलीची आत्महत्या; धर्म परिवर्तनासाठी करत होता बळजबरी
शिर्डी पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मनोज सोनी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली यावेळी न्यायालयानेही पोलीस तपासावर ताशेरे ओढले आहे. शिर्डीतून बेपत्ता होणारी माणसे अखेर गेली कुठे? यात मानवी अवयव तस्करीचे रॅकेट आहे की काय? असा सवाल न्यायालयानेही उपस्थित केला आहे.
शिर्डी पोलिसांनी न्यायालयात बेपत्ता झालेल्या महिला पुरूषांची यादी सादर केली आहे. यात 3 वर्षातीलच बेपत्ता व्यक्तींचा आकडा थक्क करणारा आहे.
वर्ष बेपत्ता अजूनही बेपत्ताच 2017 71 202018 82 132019 88 142020 38 20
गेल्या 3 वर्षात 279 जण बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झालेली आहे. यातील 67 जणांचा अजूनही तपास लागलेला नाही. अनेकजण तक्रार दाखल करतात, मात्र हरवलेली व्यक्ती घरी पोहचल्यानंतरही पोलिसांना कळवत नसल्याचं तपास अधिकारी दिपक गंधाले
यांनी सांगितले आहे.
कर्ज काढून देतो म्हणून वृद्धाला 6 लाखांना लुबाडले, अमरावतीतील धक्कादायक घटना
गेल्या तीन वर्षांतील संपूर्ण तपासाचा अहवाल शिर्डी पोलिसांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात सादर केला आहे. न्यायालयाने मानवी तस्करी किंवा अवयव चोरीच्या अंगाने तपास करण्याच्या स्पष्ट सूचना पोलीस अधिक्षकांना दिल्या आहेत. मात्र, पोलिसांनी याबाबत बोलताना स्पष्ट केले आहे की, मानवी तस्करी याबाबत कोणतेही पुरावे अथवा तक्रार आजपर्यंत जिल्ह्यात दाखल नसून पुन्हा एकदा नव्याने या बेपत्ता प्रकरणी तपास सुरू केला आहे, अशी माहिती दिपक गंधाले यांनी दिली.
शिर्डीत दररोज लाखो साईभक्त साई दर्शनासाठी येतात. त्यापैकी अनेकजण बेपत्ता होत आहेत. परराज्यातील महिला आणि अनेक मुली बेपत्ता झाल्या आहेत अखेर ही माणसे गेली कुठे? ती घरी परतणार की नाही? किती दिवस घरचे शोधाशोध करणार? यामागे नेमकं काय गौडबंगाल आहे? हे स्पष्ट होणे गरजेचे आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.