करनाल, 14 एप्रिल : हरयाणातील (Haryana News) करनाल जिल्ह्यातील गाव कमालपूर रोडानच्या 5 वर्षीय जशच्या हत्या प्रकरणात आरोपी काकी अंजली टीव्हीवर CID मालिका पाहत होती. इतकच नाही तर ती आपला मोबाइलवर अनेकदा सुसाइडचे व्हिडीओदेखील पाहत होती. मेडिकल बोर्डाच्या बातचीतमध्ये ती मनोरुग्ण असल्याचं समोर आलं. मिळालेल्या माहितीनुसार, तिची करनाल आणि पानीपतमधील डॉक्टरांकडून औषधं सुरू होती. या प्रकरणात मनोवैज्ञानिक बोर्डदेखील आरोपी अंजलीसोबत बातचीत करणार आहे. पोस्टमार्टमच्या रिपोर्टनुसार, जशची हत्या गळा दाबून (Murder) करण्यात आली होती. सोबतच पोस्टमार्टम रिपोर्टनुसार, मृत्यू आणि पोस्टमार्टमदरम्यानचा अवधी साधारण 24 तासांचा असल्याचं सांगितलं जातं. यादरम्यान एफएसएलच्या टीमकडून घटनास्थळाचं निरीक्षण करण्यात आलं आणि महत्त्वपूर्ण साक्ष एकत्रित करण्यात आले होते. हे ही वाचा- पुणे: मुलीला कुत्रा चावल्याने महिलेने कुत्र्यांचा घेतला जीव, घटना कॅमेऱ्यात कैद करनाल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंजलीने जशची हत्या केल्याचं कबुल केलं. अंजलीने दिलेल्या माहितीनुसार, ज्यावेळी जश तिच्या बेडवर उल्टा बसून मोबाइल गेम खेळण्यात दंग होता, तेव्हाच मागून येत काकीने मोबाइल चार्जरची व्हायर टाकून गळा दाबला. या प्रकरणात एसआयटीने दोन महिला आरोपी धनवंती पत्नी राजेश आणि सौरनदे पत्नी मुल्तान वासियान यांना 13 एप्रिल रोजी अटक केली आहे. दोन्ही महिला आरोपींना आज कोर्टात सादर करण्यात आलं. येथे दोघींना पोलिसांनी आज रिमांडवर पाठवलं आहे. अटक केलेल्या महिला नात्यात जशची ताई आणि आजी आहे. दोन्ही महिला आरोपींच्या चौकशीत हा धक्कादायक खुलासा झाला आहे. दोघांनी पुरावे मिटवण्यासाठी मुलाचा मृतदेह आपल्या छतावरुन दुसऱ्या शेडवर फेकून दिला होता. रिमांडदरम्यान या दोन्ही महिलांची चौकशी करण्यात येणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.