Pune: मुलीला कुत्रा चावल्याने संतप्त महिलेने कुत्र्याच्या पिल्लांचा घेतला जीव, पुण्यातील घटना कॅमेऱ्यात कैद
Pune: मुलीला कुत्रा चावल्याने संतप्त महिलेने कुत्र्याच्या पिल्लांचा घेतला जीव, पुण्यातील घटना कॅमेऱ्यात कैद
मुलीला कुत्रा चावल्याने संतप्त महिलेने कुत्र्याच्या पिल्लांचा घेतला जीव, पुण्यातील घटना कॅमेऱ्यात कैद
पुण्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ती म्हणजे हडपसर (Hadapsar) परिसरात एका उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या महिलेने मुलीला श्वान (कुत्रा) चावला होता. (Dog Bit Girl) या रागातून महिलने कुत्र्याच्या दोन लहान पिल्लांना काठीने बदडून ठार मारण्यात आले आहे.
पुणे, 13 एप्रिल : पुण्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ती म्हणजे हडपसर (Hadapsar) परिसरात एका उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या महिलेने मुलीला श्वान (कुत्रा) चावला होता. (Dog Bit Girl) या रागातून महिलने कुत्र्याच्या दोन लहान पिल्लांना काठीने बदडून ठार मारण्यात आले आहे. अनिता दिलीप खाटपे (वय 45) असे या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे नेमकी घटना?
अनिता दिलीप खाटपे नावाची ही महिला पुण्यातील हडपसर परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत राहते. त्यांचे वय 45 वर्षे इतके आहे. त्यांच्या मुलीला कुत्रा चावला होता. याचा त्यांना खूप राग आला आणि याच रागातून त्यांनी कुत्र्याच्या दोन लहान पिल्लांना इतके बदडले की त्यांचा मृत्यू झाला. इतकेच नव्हे तर , सोसायटीतील एकाही कुत्र्याला जिवंत ठेवणार नाही, असे म्हणत यानंतर ही महिला सोसायटीत काठी घेऊन फिरत होती. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी नीता आनंद बीडलान (वय 43) या महिलेने तक्रार दिली असून अनिता दिलीप खाटपे (वय 45) या महिलेविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - भारतात 10 पैकी 7 महिला नोकरी सोडत आहेत किंवा सोडण्याच्या विचारात; काय आहे कारण?ठाण्यात पाळीव कुत्र्यांसाठी भन्नाट आदेश -
आता पाळीव श्वानाची (कुत्रे) नोंद करावी लागणार आहे. याबाबत ठाणे मनपाने (Thane MNC) आदेश जारी केले आहेत. यामुळे आता पालिकेत नोंद केल्याशिवाय कुत्रे पाळता येणार नाहीत. नोंद न केल्यास कारवाई केली जाणार आहे. तसेच नोंद केल्यावर मनपा विशिष्ट नोंदणी क्रमांक देणार आहे. या आदेशानुसार पाळीव कुत्र्यांची वेळोवेळी माहिती पालिकेला अपडेट करावी लागणार आहे. असे आदेश काढण्यामागे पालिकेचा काय उद्देश आहे हे अजून स्पष्ट झालेले नाही.
तसेच पुढे आदेशात म्हटले आहे की, ज्या नागरिकांनी आपल्या पाळीव श्वान संदर्भात पालिकेत नोंद केली आहे, त्यांना यासंदर्भातील नूतनीकरण करणे आवश्यक आहे. या नियमांचे पालन न केल्यास पाळीव कुत्रे नोंद नियमांतर्गत संबंधित नागरिकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.