नांदेड 18 जानेवारी : भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना काही दिवसांपूर्वी एक संशयास्पद पाकीट पोस्टाने मिळाल्याने खळबळ उडाली होती. त्या पाकिटात पांढरं पावडरं आढळल्याने पोलिसांची चिंता वाढली होती. महाराष्ट्रातून हे पाकीट मिळालं होतं. त्यामुळे मध्यप्रदेश ATSने त्याचा शोध सुरू केला होता. हे पाकिट मिळाल्यानंतर मध्यप्रदेश ATSने महाराष्ट्र पोलिसांशी संपर्क साधला होता. त्यानंतर महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश पोलिसांनी त्या आरोपीचा छडा लावून त्याला अटक केली. मध्यप्रदेश ATSला त्या डॉक्टरांचं लोकेशन नांदेड इथं असल्याचं आढळून आलं होतं. त्यानंतर पोलिसांनी त्याचा माग काढला होता. डॉक्टर सय्यद अब्दुल रहमान खान (35) असं त्या डॉक्टरचं नाव आहे. नांदेड जिल्ह्यातल्या धानेगाव इथला तो रहिवाशी आहे. गेल्या तीन महिन्यांपासून तो पोलिसांच्या रडावर होता. वाचा- नाराज ‘शिलेदारांना’ जोडण्याचा प्रयत्न, ‘या’ आमदाराने घेतली राज ठाकरेंची भेट या आधीही त्याने पोलिसांना पत्र लिहून त्याच्या आई आणि भावाचे दहशतवाद्यांशी संबंध असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यातही घेतलं होतं. पोलीस सय्यदच्या मोबाईलच्या माध्यमातून त्याच्या लोकेशनवर नजर ठेवून होते. तो आपला मोबाईल घरीच ठेवून नांदेड, औरंगाबाद किंवा इतर दुसऱ्या शहरांमध्ये जावून पत्र टाकत असे.
वाचा- काल ‘चूक’ आज ‘अभिमान’, मेगाभरतीच्या वादावर चंद्रकांत पाटलांचा यू टर्न
ते पावडर विषारी होतं का? त्यात नेमकं काय होतं? डॉक्टरचं नेमका उद्देश काय होता? त्याचे दहशतवादी संघटनांशी संबंध आहेत का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं पोलीस घेत आहेत.