विजय वंजारा, प्रतिनिधी
मुंबई, 21 फेब्रुवारी : व्हॉट्सॲपवर महिलांना अश्लील फोटो आणि व्हिडिओ पाठवणाऱ्या एका नराधमाला मुंबईच्या मालाड पोलिसांनी अटक केली आहे. एवढेच नाही तर तो व्हिडिओ कॉल करून महिलांसोबत अश्लील कृत्यही करायचा. पीडित महिलेची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा कसून शोध घेतला आणि त्याला पुण्यातील इंदोरी भागातून बेड्या ठोकल्या आहेत.
ज्योतीराम बाबूराव मन्सूळे असे अटक केलेल्या 27 वर्षीय आरोपीचे नाव आहे. आरोपीविरोधात कलम 66/23 IPC 354 D, 509 r/w IT Act नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीची अधिक चौकशी करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणी एका महिलेने तक्रार केली होती. त्यानंतर तपासादरम्यान आरोपी पुण्यात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी पुण्यातील इंदोरी भागात सापळा रचून आरोपीला अटक केली. आरोपीची चौकशी केली असता त्याने तक्रारदार महिलेशिवाय 25 ते 30 महिलांना विविध नंबरवरुन व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉल आणि अश्लील मेसेज पाठवल्याचे सांगितले.
आरोपी महिलांना अश्लील व्हॉट्सअपवर अश्लील फोटो आणि मॅसेज पाठवायचा. मग व्हिडिओ कॉल करुन अश्लील कृत्यही करायचा. याबाबत मालाड परिसरात राहणाऱ्या एका महिलेने मालाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
हेही वाचा - 8 वर्षांचे प्रेम, पतीला घेऊन तरुणी थेट पोलीस ठाण्यात, प्रकरण समजल्यानंतर पोलिसांनाही धक्का
अप्पर पोलीस आयुक्त उ.प्रा.वि. राजीव जैन, पोलीस उप आयुक्त अजयकुमार बंसल, सहायक पोलीस आयुक्त रेणुका बागडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र अडाणे यांच्या मार्गदर्शनाखाली मालाड पोलीस ठाणे सायबर सेल पथकाचे पोलीस उपनिरीक्षक धिरज वायकोस, पोलीस शिपाई तौसीफ शेख, पोलीस शिपाई जयंत भरारे यांनी यांनी ही कारवाई केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Police, Video call, Whatsapp, Woman