पुणे 18 नोव्हेंबर : राज्यात बलात्कार, चोरी आणि हत्येच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. आता पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यात फोटो व्हायरल करण्याची धमकी देत नराधमाने तरुणीवर अत्याचार केला आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात शिंगवे गावात ही घटना घडली.
यात आरोपीनं तरुणीशी फोनद्वारे जवळीक वाढवली. यानंतर तिच्याबरोबर मोबाईलमध्ये काढलेला सेल्फी फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तसेच मारहाण करून तिला संबंध ठेवण्यास भाग पाडलं. त्याने तरुणीच्या घरी तसेच आळेफाटा येथील लॉजवर नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार बलात्कार केला.
या प्रकरणी तुषार पोपट करगळ ( वय 21 रा.शिंगवे ता. आंबेगाव ) याच्यावर पारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटना फेब्रुवारी 2020 ते नोव्हेंबर 2022 च्या दरम्यान घडली आहे. या प्रकरणी तुषार पोपट करगळ याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पारगाव पोलीस ठाण्याचे सपोनि लहु थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई लोकरे करत आहेत.
कुख्यात गुंडाच्या बायकोची काढली छेड, तिने असा घेतला बदला की तरुणाचे कापले लिंग
पुण्यातील धक्कादायक घटना -
दरम्यान, नुकतीच पुण्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली होती. यात तू मला खुप आवडतेस. तुझ्या नवऱ्याचे कर्ज फेडतो, असे म्हणत एका सासऱ्याने आपल्या सुनेला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. तसेच आपल्या या सुनेकडे शरीरसुखाची मागणी केली. या धक्कादायक प्रकारानंतर तिने आपल्या पतीला सांगितले. तर त्यानेसुद्धा आपल्या वडिलांची पाठराखण केली आणि मला तुझ्यात रस नाही. तू त्यांची इच्छा पूर्ण कर, या संतापनजक शब्दात प्रत्युत्तर दिल्याची घटनाही काही दिवसांपूर्वीच समोर आली होती. यानंतर आता आंबेगावमधून ही घटना समोर आली. एकंदरीतच पुण्यातही गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Rape news