जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / जिल्हा रुग्णालयात वॉर्ड बॉयनं नर्सच्या डोक्यात झाडली गोळी, आरोपी शरण; समोर आलं धक्कादायक कारण

जिल्हा रुग्णालयात वॉर्ड बॉयनं नर्सच्या डोक्यात झाडली गोळी, आरोपी शरण; समोर आलं धक्कादायक कारण

जिल्हा रुग्णालयात वॉर्ड बॉयनं नर्सच्या डोक्यात झाडली गोळी, आरोपी शरण; समोर आलं धक्कादायक कारण

CRIME: एका तरुणानं (young man) रुग्णालयातील स्टाफ नर्स नेहा चंदेल (Neha Chandel) हिच्या डोक्यात गोळी झाडल्यानं एकच खळबळ उडाली आहे. या घटनेत नर्सचा जागीच मृत्यू झाला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मध्य प्रदेश, 11 फेब्रुवारी: भिंड जिल्हा रुग्णालयात (Bhind District Hospital) एका तरुणानं (young man) रुग्णालयातील स्टाफ नर्स नेहा चंदेल (Neha Chandel) हिच्या डोक्यात गोळी झाडल्यानं एकच खळबळ उडाली आहे. या घटनेत नर्सचा जागीच मृत्यू झाला आहे. नेहा चंदेल या मंडला येथील रहिवासी होती. आरोपी रितेश शाक्य हा रुग्णालयामध्येच वॉर्ड बॉय आहे. घटनेनंतर आरोपीनं आत्मसमर्पण केलं आहे. पोलिसांनी आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेले पिस्तूलही जप्त केलं आहे. हे प्रकरण प्रेमप्रकरणाचं असल्याचं बोललं जात आहे. वॉर्ड बॉयनं एकतर्फी प्रेमातून ही घटना घडवून आणल्याची भीती व्यक्त होत आहे. सध्या पोलिसांनी प्रत्येक बाजूनं तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 24 वर्षीय नेहा चंदेल 2018 मध्ये स्टोअर प्रभारी म्हणून रुजू झाली होती. ती हाऊसिंग कॉलनीत भाड्यानं राहत होती. गुरुवारी संध्याकाळीही ती नेहमीप्रमाणे रुग्णालयात होती. रस्त्यावरच्या कुत्र्यावर नराधमाकडून बलात्कार, ‘या’ एका चुकीमुळे उघड झाली घटना दरम्यान, एका तरुण आला आणि त्यानं तिच्यावर गोळी झाडली. संध्याकाळी 6.15 च्या सुमारास रुग्णालयातील कर्मचारी स्टोअरमध्ये गेले असता हा प्रकार उघडकीस आला. त्यानं अन्य कर्मचाऱ्यांना यासंदर्भातली माहिती दिली. या घटनेनंतर येथे गोंधळ उडाला. पोलिसांनाही याबाबत कळवण्यात आलं. सीसीटीव्ही फुटेजद्वारे तपास सुरु ज्या रुग्णालयाच्या स्टोअरमध्ये खून झाला ते स्टोअर जिल्हा रुग्णालयाच्या आत आहे. तिथे फार कमी लोक येतात आणि जातात. मालही ठेवण्यात येतो. यामुळेच या घटनेची कोणालाच माहिती मिळू शकली नाही. घटनास्थळी सीसीटीव्हीही लावण्यात आले आहेत. याचाही तपास सुरू आहे. प्रेमप्रकरण असल्याचा पोलिसांचा अंदाज सध्या प्रेमप्रकरणाचा तपास सुरू असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. आरोपीचीही चौकशी सुरू आहे. एकतर्फी प्रेमातून हा गुन्हा घडल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. घटनेनंतर सुमारे तासाभरात रुग्णालयाचा वॉर्ड बॉय रितेश शाक्य पोलिसांना शरण आला. आरोपी रितेश नर्सपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. फेब्रुवारीत होणार होतं लग्न पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहा या महिन्यात फेब्रुवारीमध्ये लग्न करणार होती. काही कारणास्तव ते पुढे ढकलले गेले. पोलिसांनी घटनास्थळावरून मोबाईलही जप्त केला आहे. घटनेनंतर रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांमध्ये संताप या घटनेनंतर रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं. सर्व नर्स रागाने बाहेर आल्या. अशा असुरक्षित वातावरणात काम करणार नसल्याचं त्यांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात