Home /News /national /

रस्त्यावरच्या कुत्र्यावर नराधमाकडून बलात्कार, CCTV कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला Video

रस्त्यावरच्या कुत्र्यावर नराधमाकडून बलात्कार, CCTV कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला Video

Representative image

Representative image

एका 58 वर्षीय व्यक्तीवर रस्त्यावरच्या कुत्र्यावर बलात्कार (Rape of Street Dog) केल्याचा आरोप आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

    हैदराबाद, 11 फेब्रुवारी: तेलंगणातील (Telangana) हैदराबादमधून (Hyderabad) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 58 वर्षीय व्यक्तीवर रस्त्यावरच्या कुत्र्यावर बलात्कार (Rape of Street Dog) केल्याचा आरोप आहे. ही घटना सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये (CCTV Video) कैद झाली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. व्यक्तीनं रस्त्यावरच्या कुत्र्यासोबत केलं दुष्कर्म इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, ही घटना हैदराबादच्या नल्लाकुंटा (Nallakunta) पोलीस स्टेशन परिसरात घडली. या घृणास्पद प्रकाराबद्दल एका प्राणीप्रेमीने त्या व्यक्तीविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अशी उघडकीस आली घटना सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये आरोपीला रस्त्यावरील कुत्र्यावर बलात्कार करताना प्राणीप्रेमींनी पाहिलं होतं. त्यानंतर त्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. रस्त्यावरील कुत्र्यांशी हे कृत्य करणाऱ्यांपासून महिला आणि मुलीही सुरक्षित नसल्याचं प्राणीप्रेमींचं म्हणणं आहे. अशा लोकांना तुरुंगात टाकावं. त्यांचं बाहेर राहणं हा खूप मोठा धोका आहे. सीसीटीव्हीमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड पोलीस अधिकाऱ्यानं सांगितले की, तपासात आरोपी त्याच्या पत्नीसोबत त्याच परिसरात राहतो. तब्येतीच्या कारणास्तव तो घरी असताना त्याची पत्नी काम करते. ही घटना गेल्या मंगळवारी घडली. आरोपीचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून त्यात तो रस्त्यावरच्या कुत्र्यासोबत अनैसर्गिक संबंध ठेवताना दिसत आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Dog, Hyderabad, Rape

    पुढील बातम्या