मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /पुणे RTO च्या वाहनाकडूनच वाहतूक नियमांचे उल्लंघन! ओव्हर स्पीडचा दंडही तसाच

पुणे RTO च्या वाहनाकडूनच वाहतूक नियमांचे उल्लंघन! ओव्हर स्पीडचा दंडही तसाच

पुणे RTO च्या वाहनाकडूनच वाहतूक नियमांचे उल्लंघन!

पुणे RTO च्या वाहनाकडूनच वाहतूक नियमांचे उल्लंघन!

पुणे आरटीओच्या वाहनाचा इन्शुरन्स नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

वैभव सोनावणे, प्रतिनिधी

पुणे, 19 मार्च : आरटीओ कार्यालयाकडून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला जातो. अनेकदा तर दुसऱ्या वाहनांचे बिल तुमच्या नावावर फाडल्याचे प्रकारही घडले असतील. अशा परिस्थितीत नियमावर बोट ठेऊन दुसऱ्यांवर कारवाई करणारे आरटीओ अधिकारी कर्मचारीच नियम मोडत असल्याचे प्रकरण समोर आले आहे. पुणे आरटीओ कार्यालयाचं वाहनच कायद्याचं उल्लंघन करताना आढळलं आहे.

काय आहे प्रकरण?

पुणे आरटीओ कार्यालयाकडून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला जातो. मात्र, पुणे आरटीओ कार्यालयाचे अधिकारी-कर्मचारी ज्या वाहनांच्या मदतीने प्रवास करतात, ज्यातून इतरांवर कारवाई करतात, त्या MH-04-KR 6472 या वाहनाचा इन्शुरन्स संपल्याचे व वेग मर्यादा ओलांडल्या प्रकरणी झालेला दंड भरला नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

वाचा - गाडीचा धक्का लागला अन् कारचालकाची भररस्त्यात महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण

आरटीओ कार्यालयाचे पथक ज्या वाहनांतून प्रवास करतात, त्या वाहनांची काय स्थिती आहे, याची पडताळणी 'वाहन परिवहन' या संकेस्थळाच्या आणि मोबाइल ॲपच्या माध्यमातून करण्यात आली. तेव्हा पुणे आरटीओ कार्यालयाचे अधिकारी वापरत असलेले MH-04- KR 6472 हे वाहने 'इन्शुरन्स'विनाच रोडवर धावत असल्याचे आढळून आले. तर या वाहनाने गाडी मध्ये अधिकारी असताना पुणे- मुंबई एक्सप्रेस महामार्गावर 1 जुलै 2022 रोजी 23 वाजून 6 मिनिटांनी वाहनाचे स्पीड 113 ठेवून स्पीड मर्यादा ओलाडल्या प्रकरणी दोन हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे. तो देखील आजतागायत भरण्यात आलेला नाही. परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मात्र, या विषयावर प्रतिक्रिया द्यायला नकार दिला आहे.

वाहतूक नियमांवर बोट ठेवून कारवाई करणारे आरटीओ अधिकारीच नियम पाळत नसतील नियम फक्त आमच्यासाठी आहे का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत. यावर आता शिंदे-फडणवीस सरकार काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

First published:

Tags: RTO, Traffic Rules