जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / 'SUVमध्ये बलात्कार करण्याइतपत जागा असते?' पोलिसांचा संतापजनक सवाल, RTO अधिकारीही हैराण

'SUVमध्ये बलात्कार करण्याइतपत जागा असते?' पोलिसांचा संतापजनक सवाल, RTO अधिकारीही हैराण

'SUVमध्ये बलात्कार करण्याइतपत जागा असते?' पोलिसांचा संतापजनक सवाल, RTO अधिकारीही हैराण

क्राईम ब्रांचनं (Local Crime Branch) आरटीओला असा सवाल केला, की स्पोर्ट्स यूटिलिटी व्हीकल म्हणजेच SUV मध्ये इतकी जागा असते का की त्यात एखाद्यावर बलात्कार (Rape) केला जाऊ शकेल?

  • -MIN READ
  • Last Updated :

अहमदाबाद 09 मे: पोलीस म्हटलं की आपल्या मनात एक वेगळंच आदरायुक्त चित्र निर्माण होतं. त्यामुळे, त्यांच्याकडून एखादी विचित्र गोष्ट घडली की सर्वांचंच लक्ष तिकडे जातं. असंच एक प्रकरण समोर आलं आहे. यात पोलिसांनी (Police) रोड ट्रान्सपोर्ट ऑफिसला (RTO) विचारलेला एक सवाल सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. वडोदरा येथील लोकल क्राईम ब्रांचनं (Local Crime Branch) आरटीओला असा सवाल केला, की स्पोर्ट्स यूटिलिटी व्हीकल म्हणजेच SUV मध्ये इतकी जागा असते का की त्यात एखाद्यावर बलात्कार (Rape) केला जाऊ शकेल? इतकंच नाही तर पोलिसांनी आरटीओला हेदेखील विचारलं आहे, की एखाद्या गाडीमध्ये सेंट्रल लॉकिंग सिस्टिम कशाप्रकारे काम करते. पोलिसांनी ही चौकशी टोयोटा फॉर्च्यूनर गाडीबद्दल केली आहे. या गाडीचे मालक भावेश पटेल आहेत. ते पाडरा नगरपालिकेचे नगरसेवक व कृषी उत्पन्न बाजार महामंडळाचे माजी संचालक (एपीएमसी) होते. त्यांच्यावर काही गुन्हे दाखल आहेत. साधारणतः आरटीओ एखाद्या गाडीच्या अपघातानंतर त्याच्या फिटनेस सर्टिफिकेटबद्दलची माहिती देतं. त्या गाडीमध्ये किती जागा होती किंवा इतर गोष्टींची नाही. त्यामुळे पोलिसांच्या या सवालामुळे आरटीओ अधिकारीही नाराज आहेत. गुन्हे शाखेचे ऑफिसर दिवानसिन यांनी सांगितलं, की त्यांच्याकडे आलेल्या तक्रारीच्या आधारावर ते या गोष्टीचा तपास लावण्याचा प्रयत्न करत आहेत, की बलात्कारासारखी घटना गाडीच्या मागच्या सीटवर घडू शकते का? याशिवाय त्यांनी असंही म्हटलं, की आम्ही हे समजून घेण्याचाही प्रयत्न करत आहोत, की गाडीमध्ये बलात्कार केला गेला असेल तर पीडितेनं पळ काढण्याचा प्रयत्न केला की नाही. यासाठी गाडीच्या लॉकिंग सिस्टमबद्दल माहिती मिळवण्याचा प्रयत्न ते करत आहेत. बलात्काराची ही कथित घटना 26 आणि 27 तारखेच्या मध्यरात्री घडली आहे. पोलिसांनी या घटनेची 30 एप्रिलला तक्रार मिळाली. यानंतर आरोपीला 2 मे रोजी राजस्थानातून ताब्यात घेण्यात आलं. पटेल सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. भावेश पटेलची याआधीही अठरा वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये चौकशी सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात