लखनऊ, 10 जानेवारी : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh News) बलरामपुर जिल्ह्यात तुलसीपुरचे माजी चेअरमन फिरोज पप्पू यांची हत्या समाजवादी पार्टीचं तिकीट ( Assembly constituency) मिळवण्यासाठी झाल्याचं समोर आलं आहे. हत्याचं कारस्थानात समाजवादी पार्टीमधून (Samajwadi Party) दोन वेळा खासदार असलेले रिजवान जहीर, त्यांचा जावई रमीज आणि मुलगी जेबा रिजवानसह सहा जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी या सहा जणांना न्यायालयासमोर हजर केलं असून तेथून त्यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक हेमंत कुटियालने सांगितलं की, 4 जानेवारी रात्री उशिरा तुलसीपूर पोलीस ठाणे हद्दीतील निवासी माजी चेअरमन फिरोज खां उर्फ पप्पू यांची त्यांच्या घराजवळ अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार केले. यानंतर गळ्यावर वार करीत त्यांची हत्या करण्यात आली होती. गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस या प्रकरणाचा तपास करीत होती. हे ही वाचा- 11 वीतील मुलाच्या आत्महत्येमागे Instagram ठरलं कारणं; कुटुंबाला बसला जबर धक्का रविवारी रात्री या प्रकरणात अटकसत्र सुरू करण्यात आली. यामध्ये माजी खासदार, त्यांची मुलगी, जावई यांना पोलिसांनी अटक केली आहे. हत्या करणारा मेराजुल हक उर्फ मामा, महफूज व शकीलदेखील पोलिसांच्या ताब्यात आहे. एसपींनी दिलेल्या माहितीनुसार, माजी खासदार आपल्या मुलाला तुलसीपूर विधानसभा मतदार संघातून समाजवादी पार्टीचं तिकीट देण्यासाठी प्रयत्न करीत होते. मात्र हे तिकीट फिरोज पप्पू यांना देणार असल्याचं निश्चित झालं होतं. यामुळे त्यांना रस्त्यातून हटवण्यासाठी त्यांच्या खूनाचं कारस्थान रचण्यात आलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.