Home /News /crime /

11 वीतील मुलाच्या आत्महत्येमागे Instagram ठरलं कारणं; कुटुंबाला बसला जबर धक्का

11 वीतील मुलाच्या आत्महत्येमागे Instagram ठरलं कारणं; कुटुंबाला बसला जबर धक्का

कधीतरी दुसऱ्याच्या फोनमध्ये इन्स्टाग्राम अकाउंटमधून लॉगइन केलं असेल आणि लॉगआउट करायचं राहून गेलं असेल, तर ते तपासता येऊ शकतं. अनेकदा तुमचं अकाउंट दुसरं कोणी वापरत तर नाही ना, अशीही शंका येते. असं वाटत असल्यास तुम्ही याबाबत माहिती मिळवू शकता आणि अकाउंट लॉगआउट करू शकता.

कधीतरी दुसऱ्याच्या फोनमध्ये इन्स्टाग्राम अकाउंटमधून लॉगइन केलं असेल आणि लॉगआउट करायचं राहून गेलं असेल, तर ते तपासता येऊ शकतं. अनेकदा तुमचं अकाउंट दुसरं कोणी वापरत तर नाही ना, अशीही शंका येते. असं वाटत असल्यास तुम्ही याबाबत माहिती मिळवू शकता आणि अकाउंट लॉगआउट करू शकता.

या घटनेनंतर आईला जबर धक्का बसला आहे.

    जयपूर, 9 जानेवारी : 16 वर्षीय योगेशला इंस्टाग्रामवर रील्स (Reels on Instagram) बनवायचं व्यसन होतं. अभ्यास बाजूलाच त्याला तर या रील्सच्या नादात खाण्या-पिण्याची आठवण येत नव्हती. मुलाच्या या सवयीला आई पुरती वैतागली होती. ती वारंवार मुलाला यावर ओरडत होती. मात्र त्याची सवय काही कमी होत नव्हती. त्यानंतर त्याच्या आईने रागाने त्याच्याकडून मोबाइलच हिसकावून घेतला. योगेशला या गोष्टीचा इतका राग आला की, त्याने विहिरीत उडी मारून आत्महत्या (Suicide) केली. रविवारी सायंकाळी विहिरीतून त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. ही घटना राजस्थानातील पाली पोलीस ठाणे हद्दातील आहे. मुंडारा गावाचे निवासी ट्रक ड्राइवर हरिलाल मेघवाल यांचा 16 वर्षांचा मुलगा योगेश बावल 11वीत (सायन्स) शिकत होता. वडील कामासाठी अधिकतर बाहेर असत. त्यामुळे घराची सर्व जबाबदारी योगेशची आई लीलादेवीवर होती. गेल्या काही महिन्यांपासून योगेशला मोबाइलवर शॉर्ट व्हिडीओ तयार करण्याचं व्यसन लागलं होतं. शाळेतून आल्यानंतर तो मोबाइल घेऊन घराबाहेर पडे. गावातील तलावाशेजारी किंवा इतर ठिकाणी आपले व्हिडीओ शूट करी. 7 जानेवारी रोजी संतापलेल्या आईने दिवसभर त्याला मोबाइल दिला नाही. याच्या रागात योगेश सायंकाळी साधारण 5 वाजता घराबाहेर पडला. निघताना त्याने कोणालाच काही सांगितलं नाही. कुुटुंबीयांनी आपल्या परीने शोध सुरू केला. मात्र शेवटपर्यंत तो सापडला नाही. म्हणून शनिवारी त्यांनी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. हे ही वाचा-Video कॉल करत तरुणाने उंच पुलावरून नदीत घेतली उडी; नाशकातील हृदय पिळवटणारी घटना विहिरीत तरंगताना दिसला मृतदेह.. गावातील विहिरीत रविवारी योगेशचा मृतदेह तरंगताना दिसला. यानंतर पोलिसांना बोलावून मृतदेह बाहेर काढण्यात आला. मुलाचा मृतदेह पाहून आईला जबर धक्का बसला. आई ओक्साबोक्सी रडत आहे. मुलाच्या चांगल्यासाठी त्याला ओरडत असल्याचं ती सांगत होती.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Instagram, Rajasthan, Suicide

    पुढील बातम्या