मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /फेसबुकवर मैत्री तोडली म्हणून माथेफिरूनं घरात घुसून केली तरूणीची हत्या, आईलाही केलं जखमी

फेसबुकवर मैत्री तोडली म्हणून माथेफिरूनं घरात घुसून केली तरूणीची हत्या, आईलाही केलं जखमी

या माथेफिरू तरूणानं फेसबुकवरील मैत्री (Facebook Friendship) तोडली म्हणून तरूणीवर तिच्या घरात घुसून हल्ला केला.

या माथेफिरू तरूणानं फेसबुकवरील मैत्री (Facebook Friendship) तोडली म्हणून तरूणीवर तिच्या घरात घुसून हल्ला केला.

या माथेफिरू तरूणानं फेसबुकवरील मैत्री (Facebook Friendship) तोडली म्हणून तरूणीवर तिच्या घरात घुसून हल्ला केला.

मुंबई, 20 जून : एका माथेफिरू तरूणानं फेसबुकवरील मैत्री (Facebook Friendship) तोडली म्हणून तरूणीवर तिच्या घरात घुसून हल्ला केला. या हल्ल्यात तरूणीचा मृत्यू झाला. या माथेफिरूनं तिच्या आईलाही सोडलं नाही. त्यानं तरूणीच्या आईवरही चाकूनं हल्ला केला आणि नंतर स्वत:च्या पोटातही चाकू खुपसला. आई आणि माथेफिरू तरूणावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

काय आहे प्रकरण?

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मथुरामधील हा धक्कादायक प्रकार आहे. शिवम उर्फ अभी कश्यप असं या माथेफिरू तरूणाचं नाव आहे. या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार शिवम लग्नाची पत्रिका देण्याच्या निमित्तानं निवृत्त सैनिक तेजवीर यांच्या घरामध्ये गेला होता. यावेळी तेजवीर यांची पत्नी सुनीता आणि त्यांची 17 वर्षांची मुलगी सोनम या दोघीच घरामध्ये होत्या. शिवमनं प्रथम सोनमला लक्ष्य केले आणि नंतर तिच्या आलाही लक्ष्य केले. त्यानंतर शिवमनं स्वत:लाही चाकूनं भोसकून जखमी केले. या हल्ल्यात सोनमचा मृत्यू झाला आहे.

या प्रकरणात पोलीस अधिकारी अजय कौशल यांनी दिलेल्या माहितीनुसार सोनम आणि शिवम यांची फेसबुकच्या माध्यमातून मैत्री झाली होती. त्यानंतर काही दिवसांनी सोनमनं बोलण्यास नकार दिला होता, तसंच त्याच्याशी मैत्री देखील तोडली. त्यामुळे संतापलेल्या आरोपीनं हे टोकाचं पाऊल उचललं. तरूणीच्या आईनं यावेळी आरोपीला अडवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी तिच्यावरही त्यानं हल्ला केला.

ठाण्यात भररस्त्यात फिल्मी स्टाईल हल्ला; रक्तबंबाळ व्यक्तीला मारत राहिला निर्दयी तरुण

आरोपी तरूण आणि त्याच्या आईची प्रकृती गंभीर आहे, त्यामुळे अद्याप त्यांची चौकशी झाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

First published:
top videos

    Tags: Crime, Facebook, Murder, Uttar pardesh