जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / मुलीचा बाप कोण? सासऱ्याची DNA चाचणी केली आणि अख्खं गाव हादरलं

मुलीचा बाप कोण? सासऱ्याची DNA चाचणी केली आणि अख्खं गाव हादरलं

आता बस! महिलेने लढायचं ठरवलं. त्यापुढे इतका किळसवाणा प्रकार घडला की, ज्याचा तुमच्या-आमच्यासारखी 'माणसं' विचार करू शकत नाहीत.

आता बस! महिलेने लढायचं ठरवलं. त्यापुढे इतका किळसवाणा प्रकार घडला की, ज्याचा तुमच्या-आमच्यासारखी 'माणसं' विचार करू शकत नाहीत.

लग्नानंतर तिचं आणि नवऱ्याचं सारंकाही आलबेल सुरू होतं. मात्र नवऱ्याची मानसिक स्थिती बिघडलेली होती. या एकाच गोष्टीमुळे तिला सासरा आणि दिराच्या सततच्या अत्याचाराला बळी पडावं लागलं.

  • -MIN READ Local18 Basti,Uttar Pradesh
  • Last Updated :

रहमान, प्रतिनिधी बस्ती, 28 जुलै : मानसिक आरोग्य बिघडलेल्या माणसाशी लग्न लावून दिलं. नराधम सासऱ्याने, दिराने गैरफायदा घेतला. जवळपास 9 वर्ष तिच्यावर बलात्कार केला. तिने पोलिसांत धाव घेतली, मात्र पोलीसही काही ऐकण्यास तयार नव्हते. तिच्यावर अत्याचार सुरूच राहिले. त्यातूनच एक मुलगी जन्माला आली. आता बस! महिलेने लढायचं ठरवलं. त्यापुढे इतका किळसवाणा प्रकार घडला की, ज्याचा तुमच्या-आमच्यासारखी ‘माणसं’ विचार करू शकत नाहीत. ही कहाणी आहे, उत्तर प्रदेशच्या बस्तीमधील पीडितेची. लग्नानंतर तिचं आणि नवऱ्याचं सारंकाही आलबेल सुरू होतं. मात्र नवऱ्याची मानसिक स्थिती बिघडलेली होती. या एकाच गोष्टीमुळे तिला सासरा आणि दिराच्या सततच्या अत्याचाराला बळी पडावं लागलं. तिची तक्रार जेव्हा पोलिसांनी घेतली नाही, तेव्हा ती पोलिसांत गेल्याचं कळल्यावर सासरच्यांना पारा आणखी चढला. त्यांनी तिला बेदम मारहाण केली. मग या महिलेने सरळ अत्याचाराचा व्हिडिओ बनवून व्हायरल करायचं ठरवलं.

News18लोकमत
News18लोकमत

सासरा अत्याचार करत असताना तिने ठरवल्याप्रमाणे व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यानंतर पोलिसांनाही तिची तक्रार घेणं भाग पडलं. तक्रारीनंतर महिलेने आणखी एक धक्कादायक खुलासा केला. आपल्या तीन मुलींपैकी दोन मुली नवऱ्याच्या आणि एक मुलगी सासऱ्यापासून झाली असल्याचं तिने सांगितलं आणि डीएनए चाचणीची मागणी केली. सचिन हनीट्रॅपमध्ये अडकला? PUBG आयडीतून सीमाचं नवं सत्य समोर! डीएनए चाचणी होताच पीडितेची एक मुलगी सासऱ्याची असल्याचं आढळलं. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही नराधमांना तुरुंगात डांबलं. मात्र दीर जामिनावर बाहेर आला. बाहेर येताच त्याने नातेवाईकांसह पीडितेला मारहाण केली. याविरोधात पीडिता पोलिसांत तक्रार द्यायला गेली असता, पुराव्यांअभावी खोटी तक्रार देत असल्याचं सांगून पोलिसांनी उलट तिच्याविरोधातच तक्रार दाखल करून घेतली. आता ही पीडित महिला न्यायासाठी लढत आहे. आपल्या तीन मुलींच्या भविष्याची तिला चिंता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात