Home /News /crime /

20 वर्षे घरातच होता Serial Killer, एक एक करीत कुटुंबातील 5 जणांची हत्या

20 वर्षे घरातच होता Serial Killer, एक एक करीत कुटुंबातील 5 जणांची हत्या

गेल्या 20 वर्षात कोणालाच याबद्दल कळालं नाही. मात्र शेवटच्या हत्येनंतर एका गोष्टीमुळे बिंग फुटलं.

    गाजियाबाद, 25 सप्टेंबर :  आपण क्राइम (Crime News) किंवा एडव्हेंचर चित्रपटांमध्ये सीरियल किलर विषयी ऐकलं किंवा वाचलं असेल. अशाच एका किलरसंदर्भातील वृत्त (Real Killer) समोर आलं आहे. या किलरने जे कृत्य केलं, ते पाहून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. या किलरने 20 वर्षांमध्ये आपल्याच कुटुंबातील 5 जणांची हत्या (Man kills five members of his family) केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या 20 वर्षात या हत्यांबाबत कोणालाच काही कळालं नाही. यापैकी तिघांची हत्या त्याने स्वत:च्या हाताने केली, तर दोघांच्या हत्येसाठी सुपारी दिली. इंडिया टुडेमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, ही घटना उत्तर प्रदेशातील गाजियाबाद जिल्ह्यातील आहे. येथे मुरादनगर गाव बसंतपूर सैंथलीमध्ये राहणारा शेतकरी लीलू त्यागीवर आपल्याच घरातील पाच जणांच्या हत्येचा आरोप आहे. या शेतकऱ्याने 20 वर्षांत एक एक करीत 5 जणांची हत्या केली. त्याने एक रिटायर्ड पोलीस सुरेंद्र त्यागी याला 4 लाख रुपयांची सुपारी देऊन आपल्या भावाच्या हत्येसाठी तयार केलं. यादरम्यान पोलिसांनी 5 व्या हत्येचा खुलासा करताना आरोपीच बिंग फोडलं. पोलिसांनी आरोपी लीलू, सुरेंद्र आणि सुपारी किलर राहुल यांना अटक करण्यात आलं आहे. हे ही वाचा-व्याज नाही दिलं म्हणून तालिबानी शिक्षा; विजेच्या खांबाला बांधून बेदम मारहाण 48 वर्षांचा आरोपी लीलूने आपल्या गुन्हा कबुल करीत पोलिसांना सांगितलं की, हे सर्व त्याने आपल्या एकूलत्या एका मुलासाठी केलं. जेणे करुन सर्व प्रॉपर्टी त्याला मिळाले. यासाठी त्याने आपले दोन्ही भावांच्या 4 मुलांसह एक भाऊ सुधीर यांची हत्या केली. तो दुसरा भाऊ ब्रजेश याला मारण्याच्या तयारीत होता. दुसऱ्या भावालाही मारलं असतं तर सर्व संपत्ती त्याच्या एकट्या मुलाला मिळाली असती. भावाच्या पत्नीसोबत केलं लग्न लीलूने पोलिसांना सांगितलं की, त्याने 20 वर्षांपूर्वी संपूर्ण संपत्ती मिळवण्यासाठी हा प्लान केला केला. 2001 मध्ये त्याने भाऊ सुधीर याची सुपारी देऊन हत्या केली आणि त्याचा मृतदेह नदीत फेकला. त्यानंतर मृत भावाच्या पत्नीसोबत लग्न केलं. जेव्हा दोघांना मुलगा झाला त्यानंतर त्याने सर्व प्रॉपर्टी मुलाला मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले. आरोपीने सुरुवातील 2001 मध्ये मोठ्या भावाची हत्या 1 लाखांची सुपारी देऊन केली. आणि मृतदेह नदीत फेकला. त्याने घरातील मंडळींना सांगितलं की, त्याचा भाऊ रागावून कुठेतरी निघून गेला आहे. 2006 मध्ये त्याने आपली पुतणी पारूलच्या जेवणात विष मिसळलं आणि तिची हत्या केली. विषारी किडा चावल्याचं सांगून त्याने हे प्रकरण मिटवलं. यानंतर 2009 मध्ये तिसरी आणि 2013 मध्ये चौथी हत्या केली. आरोपीने 8 ऑगस्ट 2021 मध्ये आपल्या दुसऱ्या पुतण्याची सुपारी देऊन त्याची हत्या केली. यातच मुलगा रागाने पळून गेल्याचं त्याने सांगितलं. मात्र तरीही त्याच्या पालकांनी पोलिसात तक्रार नोंदवली. यानंतर पोलिसांनी याचा खुलासा केला. त्याने पोलिसांना सांगितलं की, केलेल्या कृत्याची मला शरम नाही. उलट प्रत्येक हत्येनंतर तो मनातल्या मनात खूश होत होता.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, Murder, Serial killer, Uttar pradesh

    पुढील बातम्या