Home /News /crime /

अजून एक आयेशा! पैशापुढं त्यांचं प्रेम पडलं फिकं, तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल

अजून एक आयेशा! पैशापुढं त्यांचं प्रेम पडलं फिकं, तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल

हुंड्यापुढं लोकांना काहीच दिसत नाही. कडक कायदे असूनही या परिस्थितीत काही फरक पडत नाही असं चित्र आहे.

    बदायूं, 9 मार्च : हुंड्याच्या आणि पतीच्या साबरमती नदीमध्ये उडी मारून आयेशानं जीव दिला. या घटनेआधी तिनं केलेला व्हिडिओ अजूनही अनेकांचे डोळे ओले करतो आहे. या घटनेची धूळ खाली बसत नाही तोवर अजून एक अशीच घटना समोर आली आहे. .युपीच्या बदायूं (Uttar Pradesh News) इथं अजून एका तरुणीनं हुंड्याची सतत मागणी आणि छळाला कंटाळून आपला जीव दिला आहे. अहमदाबादच्या आयेशानंतर (Ahmedabad Aisha Suicide Case) आता बदायूंच्या शमाला हुंड्यानं गिळून टाकलं आहे.  (Badaun news) मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बदायूंच्या एसएसपी ही घटना बदायूंच्या सकरी जंगल या गावची आहे. गावातली 22 वर्षीय तरुणी शमा आणि 25 वर्षीय अतिक हे दोघे एकमेकांच्या प्रेमात होते. दोघांच्या या संबंधाची माहिती जेव्हा त्यांच्या कुटुंबियांना कळाली, तेव्हा नातेवाईकांनी त्यांचा निकाह करून देणं योग्य समजलं. 17 मार्चला दोघांची एंगेजमेंट होणार होती. (girl commits suicide as boyfriend denies nikah) एंगेजमेंटच्या आधी निकाहसाठीच्या काही अटी अतीकनं सांगितल्या. तरुणीचं कुटुंब या मागण्या पुऱ्या करू शकत नव्हतं. दोन्ही कुटुंबामध्ये बरीच चर्चा झाली. दोन्ही पक्षांचा वाद सोडवण्यास गावात एक पंचायतसुद्धा बोलवली गेली. मात्र मुलानं भर पंचायतीत निकाह करण्यास नकार दिला. आपल्या प्रियकराचं हे रूप पाहून अतीव दुःखात शमानं आत्महत्या केली. (family asks for dowry badaun girl hangs herself) सांगितलं जातं आहे, की भर पंचायतीत शमाच्या तोंडावरच अतिकनं निकाह करायला नकार दिला. आपल्या प्रियकरानं घेतलेला हा एकतर्फी निर्णय पाहून शमा कोलमडली. यानंतर ती सरळ घरी गेली आणि तिनं खोलीत फाशीचा दोर गळ्यात घालत आत्महत्या केली. शमा पूर्वीपासूनच म्हणत होती, की अतिकशी निकाह न झाल्यास ती जीव देईल. हेही वाचा Nagpur News:खुर्चीवर बसवले आणि हात पाय बांधून 65 वर्षीय व्यक्तीची निर्घृण हत्या पोलीस घेत आहेत अतिकचा शोध शमाच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी केस दाखल करत अतिकचा शोध सुरू केला आहे. अतिक आणि त्याच्या कुटुंबावर हुंडा मागणं आणि आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याचा आरोप आहे. हेही वाचा Asian Paints Where The Heart Is मध्ये दिसणार स्मृची मंधानाचं घर याबाबत बदायूंचे एसपी संकल्प शर्मा म्हणाले, 'ही ऊझानी ठाण्याच्या क्षेत्रातील घटना आहे. यात एका 22 वर्षीय युवतीनं आपल्याच घरात आत्महत्या केली. याबाबत दिलेल्या माहितीआधारे आयपीसीचं कलम 306 आणि डॉवरी प्रोव्हिजन ऍक्टच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केलेला आहे. याबाबत जी काही तथ्यं समोर येतील त्यानुसार कारवाई केली जाईल.'
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime, India, Love story, Suicide, Uttar pradesh

    पुढील बातम्या