Home /News /crime /

भयंकर! मानवी हात आणि बोटं त्यानं कढईत शिजत ठेवली; बायकोनं पाहिलं आणि...

भयंकर! मानवी हात आणि बोटं त्यानं कढईत शिजत ठेवली; बायकोनं पाहिलं आणि...

एखादी व्यक्ती किती विकृत आणि भयंकर वागू शकते हे सांगता येत नाही. उत्तर प्रदेशातील 32 वर्षीय तरुणाने चक्क माणसाचा हात आणून तो कढईत शिजवत ठेवला होता.

    बिजनौर, 10 मार्च : एखादी व्यक्ती किती विकृतपणे वागू शकते हे सांगता येत नाही. उत्तर प्रदेशातील बिजनौर इथं 32 वर्षीय तरुणाने एका माणसाचे हात आणि बोटं खाण्यासाठी ती शिजवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हा भयंकर असा प्रकार पाहून तरुणाची पत्नीही हैराण झाली. यामुळे घाबरलेल्या पत्नीने शेजाऱ्यांना याची माहिती दिली. तेव्हा शेजाऱ्यांनी तरुणाला घरातच कोंडून घातले आणि पोलिसांना बोलावलं. य़ाबाबत मिळालेली माहिती अशी की, बिजनौर इथं राहणाऱ्या संजय नावाचा तरुण दारुच्या आहारी गेला आहे. तो बाजारातून भाजी घेऊन लवकर परतल्यानं पत्नी आनंदी झाली होती. भाजी आणल्यानंतर संजय स्वत:च जेवण करायला लागला तेव्हा पत्नीने किचनमध्ये जाऊन बघितलं. त्यावेळी तिला मोठा धक्काच बसला. दारुच्या नशेत संजय माणसाचा हात आणि बोटं एका पॉलिथीनमध्ये गुंडाळून घेऊन आला होता आणि ते शिजवत होता. किचनमध्ये पाहिलेल्या प्रकारानंतर संजयची पत्नी तिथून बाहेर गेली. त्यानंतर शेजारी जाऊन तिथून पोलिसांना या गोष्टीची माहिती दिली. पोलिस घटनास्थळी येईपर्यंत शेजाऱ्यांनी संजयला त्याच्याच घरात कोंडून घातलं. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत संजयने काही दिवसांपूर्वी त्याच्या वडिलांवरही हल्ला केल्याचं समोर आलं आहे. या प्रकारानंतर संजयच्या पत्नीने भीतीमुळे त्याच्या घरी जाण्यास नकार दिला आहे. हे वाचा : टोळी युद्ध? भरदिवसा झालेल्या गोळीबाराने हादरलं नाशिक पोलिस अधिकाऱ्यांनी या प्रकाराची माहिती देताना सांगितलं की, संजयने जवळच्याच शवागारातून कुणाचा तरी हात आणला आणि घरी आणून शिजवत होता असं समोर येत आहे. सध्या याची चौकशी सुरु आहे. त्याच्या घरातून माणसाचे मांस जप्त केलं आहे. तसंच संजयला ताब्यात घेतलं आहे. गंगेच्या काठावर जिथं मृतदेह जाळले जातात तिथून संजयनं मांस आणल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हे वाचा : बेडरूममध्ये बॉयफ्रेंडसोबत होती मुलगी, आईला येताना पाहाताच तिनं केलं असं..
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Uttar pradesh

    पुढील बातम्या