मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

हे टोळी युद्ध? भरदिवसा झालेल्या गोळीबाराने हादरलं नाशिक

हे टोळी युद्ध? भरदिवसा झालेल्या गोळीबाराने हादरलं नाशिक

खून, खुनाचा प्रयत्न, सोनसाखळी चोरी, वाहनांची जाळपोळ अशा एक ना अनेक गुन्हेगारीच्या घटनांनी नाशिक शहर चांगलच बेजार झालं आहे.

खून, खुनाचा प्रयत्न, सोनसाखळी चोरी, वाहनांची जाळपोळ अशा एक ना अनेक गुन्हेगारीच्या घटनांनी नाशिक शहर चांगलच बेजार झालं आहे.

खून, खुनाचा प्रयत्न, सोनसाखळी चोरी, वाहनांची जाळपोळ अशा एक ना अनेक गुन्हेगारीच्या घटनांनी नाशिक शहर चांगलच बेजार झालं आहे.

  • Published by:  Ajay Kautikwar

लक्ष्मण घाटोळ, नाशिक 09 मार्च :  नाशिकच्या मखमलाबाद परीसरात भर दिवसा एका युवकावर गोळीबार झाल्याची घटना घडलीय. पूर्ववैमनसयातून झालेल्या या हल्ल्यात किरण भडंगे हा युवक जखमी असून त्याचेवर नाशिक मधीलच एका खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. दरम्यान भरदिवसा झालेल्या या गोळीबाराच्या घटना नाशिक मधील वाढती गुन्हेगारी पुन्हा एकदा उघड झाली आहे. भर दिवसा झालेल्या या गोळीबाराने नाशिक हादरून गेलं आहे.

खून, खुनाचा प्रयत्न, सोनसाखळी चोरी, वाहनांची जाळपोळ अशा एक ना अनेक गुन्हेगारीच्या घटनांनी नाशिक शहर चांगलच बेजार झालं आहे. रविवारी नाशिक मध्ये शहर पोलिसांचा मॅरेथॉन इव्हेंट पार पडला या पोलिसांच्या या महाइव्हेंटला काही तास उलटत नाही तोच नाशिकच्या मखमलाबाद परिसरात एका टोळक्याने भरदिवसा एका तरुणावर गोळीबार करत प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात किरण भडांगे हा युवक जखमी झाला असून त्याच्यावर नाशिकमधील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. पूर्ववैमनस्यातून एका टोळक्याने भर दिवसा हातात धारदार शस्त्र आणि रिव्हॉल्वर घेऊन हल्ला केल्याने संपूर्ण शहर हादरलय.

 हे वाचा -  बेडरूममध्ये बॉयफ्रेंडसोबत होती मुलगी, आईला येताना पाहाताच तिनं केलं असं..

शहरात दहशत माजविणाऱ्या या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेच गांभीर्य ओळखून संशयितांच्या मागावर पोलिसांच एक पथक  रवाना केलं आहे. तर जखमी युवकाने दिलेल्या माहितीवरून प्रशांत फड, चेतन वाघ, कुणाल वैखंडे, सचिन वास्तव या चार संशयितांविरोधात नाशिकच्या म्हसरूळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकने यांनी दिली.

 हे वाचा -  'भावाच्या अतृप्त आत्म्याने चिरला भावाचा गळा', मृतकाच्या शेजारणीचा दावा

किरकोळ कारणावरून या तरुणावर हल्ला झाला असला तरी शहराच्या मध्यवर्ती भागात भरदिवसा घडलेल्या या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

First published:

Tags: Nashik crime