कानपूर, 25 जानेवारी : उत्तर प्रदेशातील कानपूर (Kanpur) पोलिसांच्या क्राईम ब्रँच युनिटनं एका खुनी पत्नीच्या षडयंत्राचा अडीच महिन्यानंतर पर्दाफाश केला आहे. या प्रकरणातील पत्नीनं तिचा प्रियकर असलेल्या भाच्याच्या मदतीनं तीन महिन्यांपूर्वी नवऱ्याची हत्या केली होती. त्यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी नवऱ्याचं अपहरण झाल्याचं नाटक केलं. काय आहे प्रकरण? कानपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येथील मेडिकल दुकानाचे मालक रविमोहन यांची हत्या त्यांची पत्नी रेणूनं प्रियकर महेंद्रकुमार उर्फ मोनू आणि काही नातेवाईकांच्या मदतीनं पाच ऑक्टोबर रोजी केली होती. या हत्येनंतर त्यांनी रविमोहन यांचा मृतदेह कानपूरपासून शेकडो किलोमीटर दूर टाकून दिला आणि पोलिसांकडं अपहरण झाल्याची तक्रार केली. पोलिसांचं लक्ष विचलित करण्यासाठी रेणूनं स्वत:ची नस कापत नवऱ्याच्या मृत्यूनंतर आपण आत्महत्या करत असल्याचं नाटक केलं. वाचा-( प्रियकराला घरी बोलावणं प्रेयसीच्या बेतलं जीवावर; तरुणाने धारदार शस्त्राने गळा चिरून केली हत्या ) लॉकडाऊनमध्ये प्रेमसंबंध! मृत रविमोहन हे 43 वर्षांचे होते. त्यांची पत्नी रेणू त्यांच्यापेक्षा 13 वर्षांनी लहान म्हणेच 30 वर्षांची आहे. त्यांना दोन मुलं आणि एक मुलगी आहे. लॉकडाऊनच्या काळात रेणूच्या वयाचा तिचा भाचा मोनू तिच्या घरी राहयला आला. थोड्याच दिवसांत दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. या प्रकरणाची माहिती घरच्यांना समजताच त्यांनी पंचायत बोलवून मोनूला गावी परत जाण्याचा आदेश दिला. पंचायतीच्या या निर्णयानं संतापलेल्या रेणू आणि मोनू या दोघांनी मिळून पाच ऑक्टोबर रोजी रविमोहन यांची हत्या केली. नातेवाईकांनी केली तक्रार रेणू यांनी सुरुवातीला नस कापून आत्महत्या करण्याचं नाटक केल्यानं पोलिसांचा संशय तिच्यावर गेला नाही. रविमोहन यांच्या अपहरणाला एक महिना उलटल्यानंतर त्यांच्या काकांना रेणूचा संशय आला. त्यांनी याबाबत पोलिसांकडं तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र त्या दिशेनं फिरवली आणि रेणू व तिचा प्रियकर भाचा मोनू या दोघांना अटक केली. या दोघांचीही रवानगी पोलीस कोठडीमध्ये करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.