जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / हॉटेलमध्ये महिलेचा गळा चिरला, वार झाल्यावर अर्ध्या तासात गेला जीव

हॉटेलमध्ये महिलेचा गळा चिरला, वार झाल्यावर अर्ध्या तासात गेला जीव

कुटुंबातील तिघांची हत्या करुन त्याने केली आत्महत्या, हत्याकांडाने गोंदियात खळबळ (प्रातिनिधिक फोटो)

कुटुंबातील तिघांची हत्या करुन त्याने केली आत्महत्या, हत्याकांडाने गोंदियात खळबळ (प्रातिनिधिक फोटो)

हॉटेलच्या खोलीत (Hotel Room) एका अज्ञात इसमाकडून (unknown person) महिलेची हत्या (murder) झाल्याची घटना घडली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

गुरुग्राम, 24 ऑगस्ट : हॉटेलच्या खोलीत (Hotel Room) एका अज्ञात इसमाकडून (unknown person) महिलेची हत्या (murder) झाल्याची घटना घडली आहे. बनावट ओळखपत्र (bogus identity card) दाखवून हॉटेलमध्ये प्रवेश मिळवलेल्या इसमाने धारदार शस्त्राने महिलेचा गळा कापला. महिलेनं त्याही अवस्थेत इसमाचा पाठलाग करून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र रुमच्या बाहेर आल्यानंतर महिलेची ताकद संपली आणि रक्तबंबाळ अवस्थेत तिने जागीच आपले प्राण सोडले. हॉटेलमध्ये दाखवलं बनावट ओळखपत्र हरियाणाच्या गुरुग्राममध्ये राहणारी 36 वर्षीय इमराना राजीव नगर भागात भाड्याच्या घरात राहत होती. 20 ऑगस्ट रोजी ती तिच्या ओळखीचा रिक्षा ड्रायव्हर रिंकूसोबत दीक्षा हॉटेलमध्ये गेली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आरोपी सचिन त्या ठिकाणी अगोदरच उपस्थित होता. सचिननं इमराना ही आपली पत्नी असल्याचं सांगत हॉटेलमधील 206 नंबरची खोली बुक केली. हत्येचा थरार सचिन आणि इमराना एका खोलीत गेल्यानंतर काही वेळातच सचिन घाबरलेल्या अवस्थेत घाईघाईने हॉटेलबाहेर पडताना दिसला. त्याच्या मागोमाग रक्तबंबाळ अवस्थेतील इमराना बाहेर आली. काही पावलं चालल्यानंतर इमराना जागेवरच कोसळली आणि तिथेच तिने आपले प्राण सोडले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. स्टाफने दिली पोलिसांना माहिती या घटनेची माहिती हॉटेलच्या स्टाफने पोलिसांना दिली. पोलिसांनी या महिलेच्या पतीला संपर्क साधून घटनेची माहिती दिली आणि पतीच्या फिर्यादीनंतर खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. प्राथमिक चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार ही महिला उत्तर प्रदेशमधील आग्रा या ठिकाणची होती. गळा चिरून तिची हत्या करण्यात आली. हे वाचा - नारायण राणेंच्या वक्तव्यानंतर चंद्रकांत पाटलांची महत्त्वाची प्रतिक्रिया हॉटेलमध्ये बनावट ओळखपत्र दाखवून सचिन नावाच्या इसमाने प्रवेश मिळवला होता. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सचिनच्या खोलीतून काही महत्त्वाचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. मात्र ही हत्या का करण्यात आली, याचं उत्तर मात्र अद्याप मिळू शकलेलं नाही. या महिलेचे आणि खुनी सचिनचे एकमेकांशी नेमके काय संबंध होते? महिला हॉटेलमध्ये का गेली होती? तिला हॉटेलमध्ये पोहोचवणाऱ्या ऑटो ड्रायव्हरचे आणि खुन्याचे एकमेकांशी काय संबंध आहेत? याचा पोलीस शोध घेत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: crime , haryana , Murder
  • First Published :
जाहिरात
जाहिरात