भिवंडी, 15 मार्च : लग्नास नकार (denied marriage) दिल्याच्या वादातून तरुणाने मुलीच्या वडिलांची निर्घृण हत्या (murder) केल्याची घटना समोर आली आहे. गळ्यावर चाकूने वार करुन आरोपीने हत्या केली आहे. भिवंडी - वाडा राज्यमार्गावरील कवाड गावाच्या (Kavad village Bhiwandi) हद्दीत ही घटना घडली आहे. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस (Bhiwandi Taluka Police) ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. काय आहे नेमकं प्रकरण? पप्पूकुमार रामकिशोर शाह (वय 26) असे आरोपी तरुणाचे नाव असून तो मूळचा बिहार राज्यातील रहिवासी आहे. तर कमलजीत सांडे (वय 52) असे हत्या झालेल्या इसमाचे नाव आहे. मृतक कमलजीत हे कुटंबासह उल्हासनगर (ullhasnagar) कॅम्प नंबर 5 परिसरात राहत होते. तर त्यांच्या शेजारी आरोपी पप्पू गेल्या 5 वर्षांपासून राहत असल्याने दोघांमध्ये ओळख होती. त्यामुळे आरोपीचे मृतकच्या घरी ये-जा होती. त्यातच काही महिन्यांपूर्वी आरोपीने मृतक कमलजीत यांच्या मुलीसोबत लग्न करण्यासाठी मागणी केली. मात्र यामधून दोघांमध्ये भाडणं होऊन मृतकाने आरोपीला मारहाण केली होती. वाचा : हुक्का पार्टीत अश्लीलतेचा नंगानाच, 18 वेश्यांसोबत भलत्याच अवस्थेत आढळले 52 तरुण आधी दारूची पार्टी मग…. या घटनेनंतर आरोपीने मुलीचे वडील कमलजीत सांडे यांच्याकडे माफी मागत पुन्हा बोलचाल सुरु केली. मात्र आरोपीच्या डोक्यात लग्नाचे भूत शिरल्याने आरोपी पप्पूने कमलजीतचा काटा काढण्याचे ठरवले. त्यानुसार 4 मार्च रोजी पार्टीच्या बहाण्याने कल्याणहून भिवंडीला बसमध्ये नेले. त्यानंतर आनगावला जाणाऱ्या एका खाजगी वाहनात बसले. मात्र वाटेत त्यांनी कवाड गावच्या हद्दीत उतरून एका कंपाऊंड असलेल्या मोकळ्या जागेत बसून दोघांनी दारूची पार्टी केली. पार्टी केल्यानंतर दोघांमध्ये पुन्हा लग्नाच्या मागणीवरून वाद झाला. त्यावेळी आरोपीने कमलजीतच्या गळ्यावर चाकूने वार करून घटनास्थळावरून तो पुन्हा उल्हासनगरात आला. दुसरीकडे वडील घरी आले नाही म्हणून कमलजीत यांच्या मुलीने वडिलांच्या मोबाईलवर संपर्क केला असता रिंग वाजली त्यानंतर मोबाइल बंद येत होता. त्यामुळे मुलीने आरोपीकडे वडिलांची चौकशी केलीय त्यावेळी पप्पू याने कमलजीत उशिरा घरी येथील म्हणून सांगितले. मात्र दोन दिवस उलटूनही वडील घरी आले नाही म्हणून कमलजीत यांच्या मुलीने पुन्हा पप्पूला विचारणा केली. त्यावेळी पप्पू याने तिला सांगितले, तुझे वडील आता कधीच घरी येणार नाही. वाचा : मधुचंद्राच्या रात्रीच तुटलं लग्न; नवरीने केला मोठा खुलासा, जाणून हादरला पती सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपी अटक कमलजीतच्या पत्नीने स्थानिक हिललाईन पोलीस ठाण्यात जाऊन पती 4 मार्चला आरोपी पप्पू सोबत गेले मात्र अजुनही परत नाही अशी तक्रार दिली. त्यानंतर पोलीस पप्पू याच्या घरी गेले. त्यानंतर त्याला कळून चुकले की पोलीस आपल्याला अटक करतील त्यामुळे 9 मार्चला पहाटेच्या सुमारास आपल्या आई घेऊन आरोपी मूळ गावी बिहारला पळून गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले. भिवंडी तालुक्यातील कवाड गावातील एका कंपाऊंड मध्ये 9 मार्च रोजी कमलजीतचा मृतदेह पोलिसांना कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत मृतकाची ओळख पटवून हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु केला असता 13 मार्च रोजी भिवंडी ग्रामीण पोलिसांचे एक पथक बिहार राज्यातील पिप्राखेर गावात पोहचले. आरोपी पप्पूला पाहटेच्या सुमारास अटक करून त्याला भिवंडीत आणले. आरोपी पप्पूला न्यायालयात हजर केले असता 19 मार्चपर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सचिन दाभाडे करीत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.