जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / भाजप आमदाराच्या वाढदिवासाच्या पार्टीत झाला गोळीबार, दोघांचा मृत्यू

भाजप आमदाराच्या वाढदिवासाच्या पार्टीत झाला गोळीबार, दोघांचा मृत्यू

भाजप आमदाराच्या वाढदिवासाच्या पार्टीत झाला गोळीबार, दोघांचा मृत्यू

शुक्रवारी रात्री जबेराचे आमदार धर्मेंद्र सिंह यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमावेळी नोहटा पोलीस स्टेशन परिसरातील वणवार चौकी खेर माता मंदिराजवळ गोळीबारात दोन जण ठार (Two Persons Shot Dead) झाले. घटनेच्यावेळी आमदार तिथे नव्हते, ते रात्री आठच्या सुमारास तिथून निघून गेले होते.

  • -MIN READ
  • Last Updated :

भोपाळ 06 मार्च : मध्यप्रदेशच्या दमोहमध्ये सतत हत्येच्या घटना समोर येत आहेत. नरसिंगगडमध्ये एका व्यक्तीची गोळ्या घालून हत्या केल्याची बातमी ताजी असतानाच आता आणखी एक घटना समोर आली आहे. शुक्रवारी रात्री जबेराचे भाजप आमदार धर्मेंद्र सिंह यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमावेळी नोहटा पोलीस स्टेशन परिसरातील वणवार चौकी खेर माता मंदिराजवळ गोळीबारात दोन जण ठार (Two Persons Shot Dead) झाले. घटनेच्यावेळी आमदार तिथे नव्हते, ते रात्री आठच्या सुमारास तिथून निघून गेले होते. नोहटा पोलीस स्टेशनचे प्रभारी सत्येंद्रसिंह राजपूत यांनी सांगितले, की ही घटना शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. दोन्ही बाजूंमध्ये सुरू असलेल्या या वादामध्ये मोनू उर्फ जोगेंद्र राजपूत आणि अरविंद जैन या आमदार प्रतिनिधीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, आमदार धर्मेंद्रसिंग लोधी यांच्या वाढदिवसाच्या पार्टीचं आयोजन कार्यकर्त्यांनी ग्राम बनवार येथे केलं होतं. यासाठी आमदार 7 वाजता याठिकाणी पोहोचले होते. पार्टी संपल्यानंतर आमदार तिथून निघून गेले. यानंतर अरविंद जैन कल्याण सिंह उर्फ कलू ठाकूर याला शिवीगाळ करत होते. याचदरम्यान आरडाओरडा ऐकून शेजारीच असणारा मोनू उर्फ जोगेंद्र पिता गोविंद सिंह राजपूत त्यांच्या भांडणं सोडवण्यासाठी मध्ये आला. इतक्यात कोणीतरी गोळीबार केला आणि दोघेही जखमी झाले. त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. आमदार प्रतिनिधी अरवेंद्र जैनची हत्या कोणी केली, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मृत मोनू उर्फ जोगेंद्रच्या वडिलांचं म्हणणं आहे, की त्यांचा मुलगा आणि कुटुंबीय घरी झोपलेले होते. इतक्यात कल्याण सिंहचा वाद झाला, याबाबतची माहिती मिळताच जोगेंद्र घरातून बाहेर गेला. यादरम्यान ज्यूनिअर, राहुल आणि अन्य एक छोटा मुलगा याठिकाणी उभा होते, त्यांनी गोळ्या दिल्यानंतरच राहुल जैननं गोळीबार केला. दोघांचे मृतदेह जिल्हा रुग्णालयाच्या शवगृहात ठेवण्यात आले आहेत. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात