अहमदाबाद 22 मार्च : गुजरातमध्ये दोन बाहेरील लोकांना चोर समजून बेदम मारहाण केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. एक घटना अहमदाबाद आणि दुसरी खेडा जिल्ह्यात घडली. दोन्ही घटनांमध्ये पीडितांना आपला जीव गमवावा लागला आहे. एक तरुण नेपाळचा तर दुसरा छत्तीसगडचा होता.
पहिली घटना अहमदाबादच्या बाहेरील सनाथल चौकडीजवळ घडली. कुलमन गगन हा नेपाळमधील 35 वर्षीय तरुण गेल्या आठवड्यातच अहमदाबादला नोकरीसाठी आला होता. तरुणाला अहमदाबाद जिल्ह्यातील चांगोदर भागात नोकरी लागली होती. रात्री उशिरा तो काम झाल्यावर पायी जात असताना जीवनपुरा गावाजवळून गेला. यावेळी जीवनपुरा गावातून जात असताना भटक्या कुत्र्यांनी भुंकायला सुरुवात केली. कुत्रा चावण्याच्या भीतीने तो एका व्यक्तीच्या घरात घुसला.
कुटुंबीयांनी तरुणाचे नाव विचारले मात्र त्याला गुजराती भाषा येत नसल्याने तो तरुण त्याच्याच भाषेत बोलू लागला. घरातील लोकांनी तरुणाला चोर समजून गावकऱ्यांना एकत्र केले आणि गावातील लोकांनी तरुणाला चोर समजून मारहाण करण्यास सुरुवात केली. गावातील लोकांनी तरुणाला इतकी मारहाण केली की तो बेशुद्ध झाला. त्यानंतर गावातील लोक त्या तरुणाला रिक्षात बसवून रुग्णालयात घेऊन जात असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. तरुणाचा मृत्यू होताच गावातील नागरिक काळजीत पडले आणि त्यांनी मृतदेह फेकून दिला आणि घरात झोपी गेले.
दुसऱ्या दिवशी पोलिसांना तरुणाचा मृतदेह सापडला. त्याला पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. हल्ल्यात तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी 10 जणांना अटक केली आहे. ईश्वर कोळी, संजय ठाकोर, राहुल ठाकोर, मनू कोळी, आकाश ठाकोर, चेतन साधू, सुरेश ठाकोर, नवघन ठाकोर, रायजी पिंटू ठाकोर, रायजी वीरू ठाकोर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
गावातील तरुणीशी प्रेमप्रसंग अंगलट, तरुणाला विटा ठेवून तलावात डुबवलं, घडलं भयानक
दुसरी घटना काय -
अशीच एक घटना खेडा जिल्ह्यातील मेहमदाबाद पंथक मधून समोर आली आहे. मेहमदाबाद तालुक्यातील सुधा वनसोल गावात छत्तीसगडमधील एका तरुणाला गावकऱ्यांनी चोर समजून बेदम मारहाण केली आणि काही वेळाने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले आणि संपूर्ण घटनेचा तपास केला.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री एक तरुण सुढा वनसोल या गावात आला होता. प्रत्यक्षात तो रस्ता चुकून गावात पोहोचला होता. गावकऱ्यांनी आधी तरुणाची चौकशी केली. हा तरुण काय बोलतोय हे गावकऱ्यांना समजू शकले नसल्याने हा तरुण चोरीच्या उद्देशाने गावात आला असावा, असे ग्रामस्थांना वाटले व त्यांनी तरुणावर हल्ला केला.
गावकऱ्यांनी तरुणाला चोर समजून बेदम मारहाण केली. तो बेशुद्ध पडला आणि त्याच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या. दरम्यान, मेहमदाबाद पोलिसांना माहिती मिळताच पोलीस रात्री गावात पोहोचले आणि पोलिसांनी चौकशी करून जखमी तरुणाला दाखल केले. त्यानंतर काही काळ उपचारानंतर तरुणाचा मृत्यू झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.