निखिल अग्रवाल, प्रतिनिधी मेरठ, 24 जुलै : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अनैतिक संबंधातून आत्महत्या, हत्या, तसेच बलात्काराच्याही घटना समोर येत आहेत. यातच आता आणकी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भरदिवसा दुहेरी हत्याकांडाची घटना समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये ही घटना घडली. अरविंद आणि सुरेंद्र असे यातील मृतांची नावे आहेत. न्यूज18 कडे या घटनेचा लाईव्ह व्हिडिओ आहे. यामध्ये आरोपी हत्येची घटना करताना दिसत आहे. आरोपीने आधी अरविंदला मारहाण केली आणि नंतर गोळ्या झाडून त्याची हत्या केली. तसेच दोघांची हत्या केल्यानंतर आरोपीने तेथून पोबारा केला. यानंतर रस्त्याच्या कडेला गोळ्या झाडलेल्या अवस्थेत हे मृतदेह आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
मेरठ पोलीस स्टेशन हद्दीतील हस्तिनापूर परिसरात ही घटना घडली. याठिकाणी सुरेंद्र आणि अरविंद या दोघांची भरदिवसा हत्या करण्यात आली. हस्तिनापूरच्या मुख्य रस्त्यावर दोघांवर गोळ्या झाडण्यात आल्या असून मृतदेह रस्त्यावर फेकून आरोपी पळून गेले. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अद्याप आरोपीला अटक करण्यात आली असून त्याचा शोध घेतला जात आहे.
पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, अरविंद गावात एका दुसऱ्या महिलासोबत राहत होता. मात्र, हे लिव्ह इन रिलेशनशिपला काहींचा विरोध होता. त्यामुळे दोघांनी प्रेम विवाहसुद्धा केले होते. याच संबंधांमुळे ही हत्या करण्यात आल्याचे मानले जात आहे. तर तेच सुरेंद्र हा ई-रिक्षाचालक होता. अरविंदच्या हत्येदरम्यान त्याचीही गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मृतांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारावर आणि मिळालेल्या पुराव्यांच्या आधारावर आरोपींचा शोध घेतला जात असून पोलीस याप्रकरणी कसून तपास करत आहे.