पुणे, 29 डिसेंबर : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. पुणे जिल्ह्यातही गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. तसेच पुणे शहरामध्ये दहशत वाजवण्याचा प्रयत्न राजरोसपणे सुरू आहे. यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असणाऱ्या सिंहगड लॉ कॉलेज परिसरात दोन सराईत गुन्हेगारांनी हातात कोयते घेऊन दहशत माजवली. तसेच परिसरातील दुकानांमध्ये जाऊन अनेक लोकांना त्यांनी त्यांच्या हातातील शस्त्रांनी भोसकले. यामुळे एकच गोंधळ निर्माण झाला होता. यावेळी रस्त्यात जो दिसेल त्याला चाकू दाखवून भीती दाखविली जात होती. यामुळे वाहनधारक स्तब्ध झाले होते. अखेर पोलिसांना सूचना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिसांनी या दोघा गुंडांना चांगलाच चोप दिला. हातात कोयता घेऊन पळत असताना पोलिसांनी पाठलाग करून एकाला पकडलं. यानंतर जखमी झालेल्या तरुणाला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, अत्यंत भयानक परिस्थिती सिंहगड कॉलेज परिसरात रात्र विद्यार्थ्यांना आणि रहिवाशांना अनुभवायला मिळाली. तर यानंतर अशा घटनांकडे भारती विद्यापीठ पोलीस दुर्लक्ष करत असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत.
सराईत गुन्हेगारांचा कोयत्याने नागरिकांवर हल्ला; पोलिसांनी पाठलाग केला अन्.., पुण्यातील घटनेचा VIDEO pic.twitter.com/BqLrfD8Mq6
— News18Lokmat (@News18lokmat) December 29, 2022
हेही वाचा - विद्येच्या माहेरघरात चक्क Phd चोरी! गाईडचा प्रताप; म्हणे मी दुसऱ्या विद्यार्थिनीला शब्द दिला.. स्वत:च्या मृत्यूचा बनाव करत प्रेयसीसोबत पळाला - पुणे जिल्ह्यात खुनाच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. दरम्यान खून मारामाऱ्या या घटनांमुळे पुण्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान आळंदी येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आळंदीच्या चऱ्होली बुद्रुकमध्ये मित्राची हत्या करून स्वत:लाही संपवल्याचा बनाव केल्याची घटना समोर आली आहे. हा सगळा बनाव फक्त प्रेयसीसाठी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. सुभाष थोरवे असे त्या मुलाचे नाव आहे. सुभाष थोरवे या प्रियकराने रवींद्र घेनंद या आपल्या जवळच्या मित्राचीच हत्या केली असल्याची माहिती आहे. दरम्यान यामध्ये सुभाषचा अपघाती मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. ही माहिती कुटुंबियांना समजताच त्याचा अपघातात मृत्यू झाला असे समजून कुटुंबियांनी दशक्रिया विधी घातला. तर संतोष हा प्रेयसीसोबत जेजुरीत पळून गेला होता. स्वतः च्या मृत्यूचा बनाव रचून मित्राची हत्या केल्याची माहिती प्रेयसीला देण्यात आली त्यामुळं घाबरलेली प्रेयसीने घरी जाण्याचा तगादा लावला. सोबत असलेले पैसे संपल्याने तो अत्यंत बिकट अवस्थेत होता. तो चुलत बहिणीकडे पायी जात असताना त्याला चोर समजून तेथील स्थानिक नागरिकांनी मारहाण देखील केली. संतोष थोरवेने स्वतः नाव सांगताच नागरिकांनी चुलत बहिणीला बोलावलं आणि संतोष थोरवेला बघताच बहीण बेशुद्ध पडली. स्थानिकांनी आळंदी पोलिसांना बोलावून संतोषला ताब्यात घेतलं आणि स्वतः चा मृत्यूचा बनाव केला असल्याचे खरी माहिती समोर आली.