मुंबई, 11 जुलै : राजस्थानमधील भिलवाडा येथे अनियंत्रित ट्रकनं दिलेल्या (Truck hits bike) धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. भरधाव वेगात असलेला ट्रक अनियंत्रित होऊन तो उलटला आणि त्याखाली काही वाहनं चिरडली गेली. या अपघातात (accident) एका दुचाकीस्वाराचा (One killed in Accident in Bhilvada, Rajsthan) जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्या एका कारमधील 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृत्यूच्या एक मिनिट आधी त्यांचे त्यांच्या मुलाशी फोनवर बोलणं झाले होते, असं मृत शुभमच्या वडिलांनी सांगितलं. भरधाव वेगातील ट्रक उलटला- राजस्थानच्या भिलवाडा शहरात भरधाव वेगातील ट्रक अनियंत्रित होऊन त्याखाली काही वाहनं चिरडली गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला, तर कारमधील अन्य चार जण गंभीर जखमी झाले. ट्रक चालक दारूच्या नशेत असल्याचं सांगण्यात येत आहे. चित्तोडगड-अजमेर महामार्गावर हा अपघात झाला. या अनियंत्रित ट्रकने पोलिसांची नाकाबंदीही तोडली. हा अपघात होताच तेथे उपस्थित लोकांनी ट्रकचालक आणि क्लिनरला बेदम मारहाण केली आणि त्यानंतर त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात बिजोलिया येथील शुभम सोनी याचा ट्रकने चिरडल्याने जागीच मृत्यू झाला. शुभम हा दुचाकी चालवत होता. तसेच या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने भिलवाडा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व जखमींवर उपचार सुरू आहेत. हेही वाचा: गुप्तांगात पेट्रोल ओतून प्लास्टिक पाईपने घरमालकाकडून विद्यार्थ्याला जबर मारहाण; संतापजनक कारण समोर ट्रकचालकानं तीन ठिकाणी तोडली नाकाबंदी- प्रतापनगरचे पोलिस उपअधीक्षक सदर रामचंद्र यांनी सांगितले की, हमीरगड येथून कापूस भरून एक ट्रक शहरात दाखल झाला होता. अजमेर चौकाजवळ त्यांनी दुचाकीस्वाराला धडक दिली. यानंतर संतोषी माता मंदिराबाहेर उभ्या असलेल्या कारला धडक देत तो उलटला.पोलिसांनी (Police) सांगितले की, मद्यधुंद ट्रक चालकाने शहरात 12 किलोमीटरपर्यंत गोंधळ घातला होता. तीन ठिकाणी त्याने पोलिसांची नाकाबंदीदेखील तोडली. मृत्यूच्या एक मिनिट आधी मुलानं वडिलांना केला होता फोन- अपघातानंतर लोकांनी दोघांनाही पकडले तेव्हा ट्रकचालक आणि क्लिनरने हात जोडून माफी मागायला सुरुवात केली. मात्र लोकांनी त्यांना बेदम मारहाण केली. त्याचवेळी, मृत शुभमच्या वडिलांनी सांगितलं की, मृत्यूच्या एक मिनिट आधी त्यांचे त्यांच्या मुलाशी फोनवर बोलणं झालं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.