मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

गुप्तांगात पेट्रोल ओतून प्लास्टिक पाईपने घरमालकाकडून विद्यार्थ्याला जबर मारहाण; संतापजनक कारण समोर

गुप्तांगात पेट्रोल ओतून प्लास्टिक पाईपने घरमालकाकडून विद्यार्थ्याला जबर मारहाण; संतापजनक कारण समोर

आरोपींनी बाटलीमधून आणलेलं पेट्रोल विद्यार्थ्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये भरलं. नंतर घरमालकाच्या मुलाने दिलेल्या पैशातून लॅपटॉप घेतल्याची कबुली द्यायला लावत त्याचा व्हिडिओ तयार केला

आरोपींनी बाटलीमधून आणलेलं पेट्रोल विद्यार्थ्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये भरलं. नंतर घरमालकाच्या मुलाने दिलेल्या पैशातून लॅपटॉप घेतल्याची कबुली द्यायला लावत त्याचा व्हिडिओ तयार केला

आरोपींनी बाटलीमधून आणलेलं पेट्रोल विद्यार्थ्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये भरलं. नंतर घरमालकाच्या मुलाने दिलेल्या पैशातून लॅपटॉप घेतल्याची कबुली द्यायला लावत त्याचा व्हिडिओ तयार केला

पाटणा 11 जुलै : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) इंदूरमध्ये एका घरमालकाचे क्रूर कृत्य उघडकीस आले आहे. घरात राहणाऱ्या भाडेकरू विद्यार्थ्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये या घरमालकाने पेट्रोल (Petrol) टाकल्याची आणि त्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घरमालकाने त्याच्या तीन मित्रांच्या मदतीने हे कृत्य केलं. या विद्यार्थाने नवीन लॅपटॉप विकत घेतला होता, तो लॅपटॉप (Laptop) आपल्या मुलाच्या पैशातून घेतल्याचा संशय घरमालकाला होता. त्यातून त्याने विद्यार्थाला मारहाण केली आणि त्याचे पैसे घेतल्याचं कबूल करायला लावलं. 2 पत्नींनी मिळून 3 वर्ष रचला कट; पतीच्या हत्येनंतर पोलिसांचीही केली दिशाभूल, अखेर असा झाला खुलासा तेजाजीनगर पोलिसांनी सांगितलं की, 22 वर्षीय पीडित विद्यार्थी आपल्या दोन बहिणींसह नाझिम खान याच्या घरात भाड्याने राहतो. नाझिम याच्या 9 वर्षांच्या मुलाने 50 हजार रुपये खर्च करून टाकले होते. त्याच्या मुलाने ते पैसे पीडित भाडेकरू विद्यार्थ्याला दिले होते, असं तीन वेळा सांगितलं. त्यावरून घरमालकाचा विद्यार्थ्यावर संशय बळावला. त्यानंतर नाझिमने शनिवारी शेळी खरेदीच्या बहाण्याने त्या विद्यार्थ्याला नातेवाईक आदिल यांच्या अॅक्टिव्हावरून नायता मुंडला भागात नेलं. जिथे त्याने अज्ञात व्यक्तीशी शेळी खरेदी करण्याबद्दल चर्चा केली. तसंच शेळी घराच्या छतावर बांधलेली असल्याचं सांगून विद्यार्थ्याला खोलीत नेलं. तिथे नाझिम, आदिल खान, सलमान पटेल आणि सद्दाम पटेल यांनी त्या विद्यार्थ्याला मारहाण केली. या संदर्भात दैनिक भास्करने वृत्त दिलंय. घरमालकाच्या मुलाने दिलेले 50 हजार रुपये देऊन लॅपटॉप घेतल्याची कबुली द्यायला लावण्यासाठी नाझिम, आदिल, सलमान यांनी मारहाण केल्याचं आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचं विद्यार्थ्याने पोलिसांना सांगितलं. यानंतर आरोपींनी बाटलीमधून आणलेलं पेट्रोल विद्यार्थ्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये भरलं. नंतर घरमालकाच्या मुलाने दिलेल्या पैशातून लॅपटॉप घेतल्याची कबुली द्यायला लावत त्याचा व्हिडिओ तयार केला. पण हा लॅपटॉप आपल्याला आपल्या वडिलांनी घेऊन दिल्याचं पीडित विद्यार्थाने पोलिसांना सांगितलं. दारुसाठी घरी मागितले पैसे, नकार दिल्याने रचला खूनाचा कट अन् रक्तानं माखलेल्या अवस्थेत मिळाला आई-बहिणीचा मृतदेह विद्यार्थाला मारहाण केल्यानंतर घरमालक नाझिम आणि त्याचा नातेवाईक आदिल विद्यार्थ्यासोबत घरी पोहोचले. त्याचा अपघात झाल्याचं या दोघांनी घरी सांगितलं. तसंच या मारहाणीबद्दल कोणाला सांगितल्यास त्याचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. विद्यार्थ्याने हा संपूर्ण प्रकार कुटुंबीयांना सांगितला. या घटनेनंतर पीडित विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, कुटुंबीयांना सांगितल्यानंतर पीडित मुलाने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आणि आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी घरमालक नाझिम, त्याचा नातेवाईक आदिल, मित्र सलमान आणि अन्य एकाला अटक करून न्यायालयात हजर केले. तेथून आरोपींची तुरूंगात रवानगी करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
First published:

Tags: Crime news, Shocking news

पुढील बातम्या