नवी दिल्ली 12 जानेवारी : दिल्ली त अंजली नावाच्या तरुणीचा मृतदेह अपघातानंतर एका कारने 12 किमीपर्यंत ओढून नेल्याचं प्रकरण अद्याप थंड झालेलं नाही. दरम्यान, आता दिल्लीत महिलांवरील अत्याचाराचं आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. दोन अज्ञात चोरट्यांनी महिला कॅब चालकाला लुटण्याच्या उद्देशाने तिच्यावर बिअरची रिकाम्या बाटलीने वार केले. आरोपींनी पीडितेच्या मानेवर आणि शरीराच्या इतर भागावर वार केले. या हल्ल्यात पीडितेला 10 टाके पडले आहेत. महिलेची पर्स आणि रोख रक्कमही चोरट्यांनी लंपास केली. दिल्ली अपघात प्रकरणी आरोपींची मोठी कबुली; गाडी न थांबवण्याचं सांगितलं कारण दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियांका असं पीडित महिला कॅब ड्रायव्हरचं नाव आहे. ती उबर कॅब चालवते. पीडितेचं म्हणणं आहे की 9 जानेवारी 2023 च्या रात्री तिला ग्राहकाकडून बुकिंगचा मेसेज आला. त्याचं लोकेशन दिल्लीच्या ISBT जवळ होतं. ती प्रवाशाला रिसीव्ह करणार होती आणि ग्राहकापासून जेमतेम 100 मीटर अंतरावर होती. दाट धुक्यामुळे तिने कॅबचा वेग कमी केला होता. इतक्यात तिच्या कारवर एक दगड येऊन पडला. हा दगड काच फोडून तिच्या डोक्याला लागला आणि काचेचे तुकडे तिच्या अंगावर पडले. अचानक घडलेल्या घटनेमुळे ही तरुणी गोंधळली आणि नेमकं काय झालं हे पाहण्यासाठी खाली उतरली. इतक्यात दोन व्यक्ती तिच्याजवळ आले आणि लुटण्यासाठी तिच्यासोबत झटापट करू लागले. पीडितेच्या म्हणण्यानुसार, एकाने तिचा हात पकडला आणि दुसऱ्याने तिचा मोबाईल हिसकावून घेतला. यासोबतच खिशामधील पैसेही काढून घेतले. थर्टीफस्टच्या रात्री दिल्लीत नेमकं काय घडलं? अंजलीची मैत्रीण करणार प्रकरणाचा पर्दाफाश पीडितेनं हिंमत करून या दोघांकडून आपला फोन परत घेतला. यानंतर चोर तिची कार पळवण्याचा प्रयत्न करू लागले, तेव्हा तिने ओरडून सांगितलं की ही कार माझी नाही. यासोबतच ती मदतीसाठी ओरडू लागली. हे पाहून एकाने बिअरच्या तुटलेल्या बाटलीने तिच्या मानेवर आणि छातीवर वार केले. यात पीडिता गंभीर जखमी झाली. पीडितेच्या म्हणण्यानुसार, या घटनेनंतर तिने पोलिसांनी कॉल केला. मात्र अर्ध्या तासापर्यंत काहीच रिस्पॉन्स मिळाला नाही. यानंतर तिने उबर कंपनीच्या एमरजन्सी नंबरवर कॉल करण्याचा प्रयत्न केला, मात्र तिथूनही काही रिस्पॉन्स मिळाला नाही. घटनेनंतर पीडितेनं रस्त्याने जाणाऱ्या शेकडो गाड्यांना मदतीसाठी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, सगळे फक्त पाहून तिथून निघून गेले, कोणीही तिची मदत केली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.