Home /News /crime /

सौंदर्याच्या जाळ्यात! नेते, बिजनेसमॅन, अधिकारीही Sextortionists च्या निशाण्यावर, पोलिसांनी जारी केली नियमावली

सौंदर्याच्या जाळ्यात! नेते, बिजनेसमॅन, अधिकारीही Sextortionists च्या निशाण्यावर, पोलिसांनी जारी केली नियमावली

येथे सरकारी अधिकाऱ्यांपासून ते बिजनेसमॅन, नेता आणि खासगी फर्म कर्मचारी फोन सेक्स आणि न्यूड कॉलचे विक्टीम ठरले आहेत.

    अहमदाबाद, 23 जून: सोशल मीडियावरुन (Social Media) जर तुम्हाला सुंदर चेहरा असलेल्या प्रोफाइलमधून फ्रेंड रिक्वेट आली असेल तर ती स्वीकारण्यापूर्वी पुन्हा एकदा विचार करण्याची गरज आहे. अन्यथा यात तुम्ही सायबर वसुलीचे शिकार होऊ शकता. गुजरातमध्ये असाच प्रकार समोर आला आहे. येथे सरकारी अधिकाऱ्यांपासून ते बिजनेसमॅन, नेता आणि खासगी फर्म कर्मचारी फोन सेक्स आणि न्यूड कॉलचे विक्टीम ठरले आहेत. (Gujarat police issued regulations) अशा प्रकार फसवणूक करणाऱ्यांचं प्रमाण वाढत असल्याने आता सीआयडीने सायबर क्राइम सेलला नियमावली जारी करण्याची वेळ आली आहे. याअंतर्गत फेसबुकवर सुंदर आणि बोल्ड फोटो टाकलेल्या प्रोफाइलमधून फ्रेंड रिक्वेट येणाऱ्यांना अलर्ट राहण्याचं आवाहन केलं आहे. गुजरातचे सीआयडीच्या (Gujrat CID) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की, त्यांना फेसबुकवर 6 जून रोजी एका अज्ञान महिलेकडून फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. त्यांनी फ्रेंड रिक्वेस्टचा स्वीकार केला. त्यानंतर महिलेने त्यांना फोन सेक्सचा ऑफर दिला. यानंतर महिलेने पीडितेने त्या अधिकाऱ्याकडे 5 लाख रुपयांची मागणी केली. अधिकतर कॉल बंगाल आणि राजस्थानमधून... सरकारी अधिकाऱ्यांनी सायबर क्राइम सेलशी संपर्क केला. त्यांनी तपास केल्यानंतर तिला एक संदेश पाठवला. यात पैसे देणार नसल्याचं सांगण्यात आलं. यानंतर मात्र महिलेने फोन नंबर ब्लॉक केला. सरकारी अधिकाऱ्याने हे प्रकरण सार्वजनिक होईल या भीतीने तक्रार केली नाही. याशिवाय आणखी दोन सरकारी अधिकाऱ्यांनादेखील अशा प्रकारे जाळ्यात अडकविण्यात आलं होतं. सायबर क्राइम पोलिसांच्या अधिकाऱ्याने सांगितलं की, अधिकतर कॉल पश्चिम बंगालमधून आले आहेत. तर काही कॉल राजस्थानमधील भरपूर सेकी येथून सुद्धा आले. हे ही वाचा-Online देह व्यापार! 20,000 रुपयांत मुली, WhatsApp वर डील; जागा ग्राहकाची! गुजरातमध्ये गेल्या 6 महिन्यात 500 हून अधिक कॉल केवळ अहमदाबादमध्येच सायबर क्राईम सेलमध्ये गेल्या 6 महिन्यात 500 हून अधिक तक्रारी आल्या आहेत. एका अधिकाऱ्याने सांगितलं की, वाढती संख्या पाहता गेल्या आठवड्यात नियमावली जारी करण्यात आली आहे आणि सायबर पोलीस स्टेशन आणि सायबर रेंज पोलीस ठाण्यात फॉरवर्ड करण्यात आलं आहे. नियमावलीमध्ये दिलेल्या माहितीनुसार, हा लोकांना ब्लॅकमेल करण्याचा नवीन ट्रेंड झाला आहे. जर कोणी अज्ञान व्यक्ती अशा प्रकारे व्हि़डीओ कॉलनंतर पैशांची मागणी करते, तर तातडीने जवळील सायबर क्राइम पोलीस ठाण्याशी संपर्क करा. पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यासाठी लोक घाबरतात पोलिसांनी सांगितलं की, लोकांनी अशा प्रकरणात पोलिसांशी संपर्क साधावा. तरच आपण रॅकेटचा भांडाफोड करू शकतो. एका पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, गेल्या 6 ते 8 महिन्यात अशा प्रकारच्या केसेस वाढत आहेत. सर्वसाधारणपणे लोक अशा प्रकरणात तक्रार करण्यासाठी पुढे येत नाहीत.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, Cyber crime, Facebook, Gujrat

    पुढील बातम्या