मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

Online देह व्यापार! 20,000 रुपयांत मुली, WhatsApp वर डील; जागा ग्राहकाची!

Online देह व्यापार! 20,000 रुपयांत मुली, WhatsApp वर डील; जागा ग्राहकाची!

डिजिटल तंत्राच्या माध्यमातून लोक यशाचं नवं शिखर गाठत आहेत. मात्र याचाच वापर आता देह विक्रय व्यवसायातही केला जात आहे. याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

डिजिटल तंत्राच्या माध्यमातून लोक यशाचं नवं शिखर गाठत आहेत. मात्र याचाच वापर आता देह विक्रय व्यवसायातही केला जात आहे. याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

डिजिटल तंत्राच्या माध्यमातून लोक यशाचं नवं शिखर गाठत आहेत. मात्र याचाच वापर आता देह विक्रय व्यवसायातही केला जात आहे. याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

नोएडा, 20 जून : डिजिटल तंत्राच्या माध्यमातून लोक यशाचं नवं शिखर गाठत आहेत. मात्र नोएडामध्ये अनेक टीम ऑनलाइन बुकिंगच्या माध्यमातून देहविक्रय व्यापार वाढवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शनिवार उत्तर प्रदेशातील नोएडा सेक्टर-56 येथील गेस्ट हाऊसमधून ऑनलाइन बुकिंगच्या माध्यमातून देह विक्रय व्यापर करणाऱ्या दोन टोळ्यांचा पर्दाफाश केला. पोलिसांनी या गुन्ह्यात सामील असलेल्या दोन आरोपींना अटक केलं आहे. याशिवाय दोन तरुणीदेखील पोलिसांच्या ताब्यात आहेत. नेपाळ निवासी बुद्धिमान लामा आणि पंजाबमधील निवासी मोनू ही आरोपींची नावं आहेत. हे दोघे दिल्लीच्या टोळीला ऑपरेट करीत होते.

अन्य आरोपींचा शोध सुरू

आरोपींजवळ एक आयटेन आणि तीन मोबाइलसह 24,930 रुपयांची कॅश सापडली आहे. दिल्ली येथे राहणारा टोळीतील अन्य एक आरोपी फरार आहे. तिसऱ्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी नाकाबंदी केली आहे. आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेपाल आणि वेस्ट बंगालच्या मुलींना घेतलं ताब्यात

डीसीपींनी सांगितलं की, देह विक्रय सह ह्यूमन ट्रॅफिकिंगच्या पैलूंचा समावेश करून तपास केला जात आहे. ज्या दोन तरुणींना ताब्यात घेण्यात आलं आहे, त्यापैकी एक नेपाळची आणि दुसरी वेस्ट बंगालची आहे. त्यामुळे ह्युमन ट्रॅफिकिंगच्या बाजूनेदेखील तपास करावा लागेल. हे आरोपी जास्त शिक्षित नाहीत, मात्र गुन्हा खूप डोकं लावून केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने याबाबत सूचना दिली होती. एक टोळी महिलांकडून देह विक्रयचा व्यवसाय करवून घेत असल्याची माहिती मिळाली होती. या व्यक्तीने इमेलद्वारे नंबरदेखील शेअर केला होता. सूचना देणाऱ्यांने सांगितलं होतं की, सर्व डील ही व्हॉट्सअॅपवर केली जाते. डील नक्की केल्यानंतर मुलींना देह व्यापारासाठी ठरविलेल्या ठिकाणी पाठवलं जातं.

महत्त्वाची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचण्यास सुरुवात केली. पोलिसांच्या टीममध्ये सदस्यांनी कस्टमन बनून वार्ता करण्यास सुरुवात केली आणि टोळीतील सदस्यांसोबत शनिवारी डिल नक्की केली. सापळा रचल्यानंतर जेव्हा टोळीतील दोन सदस्य शनिवारी निर्धारित ठिकाणी मुलींना सोडण्यासाठी आले तेव्हा पोलिसांनी त्यांना पकडलं.  

हे ही वाचा-ऑनलाइन क्लासमध्ये शिक्षिकेला प्रायव्हेट पार्ट दाखवित होता 9 वीचा विद्यार्थी

90 टक्क्यांपर्यंत फायदा

डीसीपींनी सांगितलं की, टोळीतील सदस्य 5 हजार ते 20 हजारात ग्राहकांसोबत डील करीत होते. यामध्ये मुलींना 1500 रुपये दिले जात होते. डील नक्की झाल्यानंतर टोळीतील सदस्य मुलींना ग्राहकाने सांगितलेल्या ठिकाणी पोहोचवित होते. ग्राहकांनाच हॉटेल, घर, कोठी सह अन्य ठिकाणांची व्यवस्था करावी लागत होती. टोळीचे सदस्य संपूर्ण डिल व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून करीत होते.

कोरोना काळात देह व्यापार ऑनलाइन झाला

या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं की, कोरोनामुळे देह व्यापार बऱ्याच अंशी ऑनलाइन मोडवर शिफ्ट झाला आहे. आता आधीपेक्षा ऑनलाइन देह व्यापारची प्रकरण अधिक समोर येत आहेत. त्यानुसार पोलिसांनीही आपल्या काम करण्याच्या पद्धतीत बदल केला आहे. देह व्यापार सारख्या घटना शहरात ज्या ज्या ठिकाणी होत आहेत, सर्वांची माहिती मिळवून पर्दाफाश करण्यात येईल, असं पोलिसांनी सांगितलं.

First published:

Tags: Crime news, Uttar pradesh news