पानीपत, 29 ऑगस्ट : गाडीचा धक्का (Car dash) लागल्याच्या कारणावरून काही किन्नरांनी (transgender) ज्येष्ठ नागरिकाची (Senior citizen) यथेच्छ धुलाई (beaten) केल्याची घटना समोर आली आहे. रस्त्याने जात असताना गाडीला चुकून धक्का लागल्याच्या कारणावरून किन्नर आक्रमक झाले आणि त्यांनी त्यांनी भर रस्त्यात जोरदार गोंधळ घातला. हात जोडून माफी मागणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाचं म्हणणं ऐकून न घेता त्याला जोरदार मारहाण केली. असा लागला धक्का ही घटना आहे हरियाणातल्या पानीपत जिल्ह्यातील असंध रोडवर शनिवारी रात्री किन्नरांचा अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. किन्नर चालवत असलेली स्कूटी आणि एक कार यांची किरकोळ धडक झाली. यात किन्नरांचीच प्रथमदर्शनी चूक असल्याचं प्रत्यक्षदर्शी सांगतात. मात्र या घटनेनंतर आक्रमक झालेल्या किन्नरांनी तिथेच गाडी उभी केली आणि कारकडे आक्रमकपणे चालत जाऊन दार उघडलं आणि ज्येष्ठ नागरिकाला ओढत समोर आणलं. ज्येष्ठ नागरिकांने हात जोडून माफी मागण्याचाही प्रयत्न केला. मात्र किन्नर काहीही ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. यावरून ज्येष्ठ नागरिक आणि किन्नरांमध्ये बाचाबाची सुरू झाली आणि किन्नरांनी फोन करून आणखी काही किन्नरांना त्या ठिकाणी बोलावून घेतलं. सर्वांनी मिळून ज्येष्ठ नागरिकाच्या कानशिलात लगावल्या आणि सर्वांदेखत त्यांची धुलाई केली. या भांडणात काही नागरिकांनी मध्यस्थी करून ज्येष्ठ नागरिकाची सुटका करण्याचा प्रयत्न केला, मात्र जो मध्ये पडेल, त्याचीदेखील हे किन्नर धुलाई करत होते. काही वेळाने तर त्यांनी कपडे उतरवून कारवर नाचायला सुरुवात केली. हे वाचा - पतीनं खात्यात जमा केले 39 लाख रुपये; पैसे घेऊन प्रियकरासोबत फरार झाली पत्नी पोलिसांना पाहून पलायन पोलिसांना याची कल्पना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस येत असल्याचं पाहून किन्नरांनी तिथून पळ काढला. या सगळ्यात चूक नसताना ज्येष्ठ नागरिकाची नाहक बदनामी झाली आणि मारदेखील खावा लागला. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून किन्नरांचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.