तिरुवनंतपुरम, 30 डिसेंबर : लहान मुलांना फारसं काही समजत नाही, असं मानत बरेच लोक त्याचा गैरफायदा घेतात. तरुणच नव्हे तर अगदी वृद्ध व्यक्ती आपल्या नातवंडांच्या वयाच्या मुलांचा लैंगिक छळ करतात. लहान मुलांचं लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करण्यासाठी आणि अशा प्रकरणातील गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी पोक्सो कायदा अस्तित्वात आला. अशाच पोक्सो (Pocso) प्रकरणातील एका वृद्ध आरोपीला कोर्टाने भयंकर शिक्षा सुनावली आहे. त्याला तिहेरी जन्मठेप सुनावण्यात आली आहे (Three times life imprisonment pocso case).
68 वर्षांच्या वृद्धाने अवघ्या 15 वर्षीय मुलीचा लैंगिक छळ केला, तिला गर्भवती केलं (68 year old man sexual abuse 16 year old girl). याच आरोपात केरळमधील कुन्नमकुलम पोक्सो कोर्टाने बुधवारी त्याला तिहेरी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.
2015 सालातील हे प्रकरण आहे. कृष्णन कुट्टी असं या आरोपीचं नाव आहे. तो मासेविक्री करायचा. अल्पवयीन मुलगी त्याच्याकडे मासे खरेदीसाठी यायची. त्याने तिच्या परिस्थितीचा फायदा घेत तिचा लैंगिक छळ केला. वयाच्या सोळाव्या वर्षीच तिने एका मुलाला जन्म दिला. डीएनए टेस्टमध्ये हे मूल कुट्टीचंच असल्याचं स्पष्ट झालं.
हे वाचा - बापानेच केला अल्पवयीन लेकीवर अत्याचार, गरोदर राहिल्यावर लावले लग्न
नातीच्या वयाच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या या म्हाताऱ्याची कोर्टाने गय नाही नाही. त्याने केलेला गुन्हा पाहून कोर्टही संतापलं. आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी कोर्टात करण्यात आली.
दोषी कोणत्याही सहानुभूतीला पात्र नाही त्याला 20 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा भोगावीच लागेल आणि शिक्षा पूर्ण होईपर्यंत त्याला पॅरोल दिला जाणार नाही. असं कोर्टाने स्पष्ट केलं आहे. सोबतच 1.50 लाख रुपयांचा दंडही ठोठावला. हे पैसे पीडितेला देण्याचे आदेश दिले आहेत, असं वृत्त लाइव्ह हिंदुस्थानने दिलं आहे.
हे वाचा - संतापजनक! 'हुंडा नको' म्हणत केलं लग्न, दीड वर्षांनी मिळाला लेकीचा मृतदेह
कायदेतज्ज्ञांच्या मते, पॉक्सो प्रकरणात आरोपीला तिहेरी जन्मठेप मिळणं दुर्मिळ आहे. 2019 साली कोल्लममधील एका पोक्सो कोर्टाने 28 वर्षीय आरोपाला तीन आजन्म कारावास आणि 26 वर्षांचा सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली होती. त्याने आपल्या सात वर्षांच्या पुतणीवर बलात्कार केला होता आणि तिची हत्या केली होती. राज्यात पोक्सो प्रकरणात देण्यात आलेली ही सर्वात मोठी शिक्षा होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.